जखाणे येथे नेहरू युवा केंद्र तर्फे समाज सेवा दिवस साजरा

31

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

दोंडाईचा(दि.19जानेवारी):-जखाने-ता. शिंदखेडाजि. धुळे भारत सरकार अंतर्गत युवा क्रीडा मंत्रालय संलग्न नेहरू युवा केंद्र,धुळे व संकल्प सेवा फाऊंडेशन यांच्या सयुंक्त विद्यमाने समाज सेवा दिवस निमीत्त मासिक पाळी व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच जखाणे येथील माध्यमिक व कनिष्ठ विद्यालयातील हॉल मध्ये नुकताच संपन्न झाला.

कार्यशाळेचे उदघाटन प्राचार्य शैलजा पाटील यांनी केले तर प्रशिक्षक म्हणून श्रीमती सपना भामरे,संकल्प फाउंडेशन च्या अध्यक्षा अश्विनी जाधव यांनी मासिक पाळी विषयी समज गैरसमज ,सॅनिटरी पॅड वापरा बाबत मार्गदर्शन केले. मुलींच्या मासिक पाळी विषयी प्रश्नांचे निरसरण करण्यात आले.त्यात सहभागी ४० मुलींना मोफत सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले.मुलींमध्ये उत्साह दिसून आला.

कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी श्रीमती माधुरी सैंदाणे,
श्री.व्ही.जी.शिंदे, श्री.एन.एन.पाटील, श्री.व्ही.एल.सोनवणे, श्री.जी.एस.सुयॆवंशी,प्रा.महेंद्र एस.बच्छाव ,प्रा.वाय.बी.पाटील, श्री.डी.बी.सोनवणे, श्री.के.व्ही.देवरे, श्री.व्ही.बी.कंखर, श्री.भुषण पाटील , श्री.के.व्ही.बच्छाव, श्री.एन.के.वाघ यांनी परिश्रम घेतले.कार्यशाळेचे संयोजन अश्विनी जाधव यांनी केले.