पतीच्या विजयाचा असा जल्लोष साजरा केला, हा फोटो एक नंबर आहे

    90

    ✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    पुणे(दि.19जानेवारी):-पुण्याच्या रेणुका गुरव यांनी आपल्या पतीच्या विजयाचा असा जल्लोष साजरा केला.कित्येक जणांचे हा फोटो पाहताना नक्कीच डोळे भिरभिरले असतील.कित्येकांचे मेंदू हालले असतील.इतरवेळी बायकोला जबरदस्तीने निवडणूकीसाठी उभे करून निवडून आणून…स्वतः भाषण लिहून देणारा आणि तिचे सर्व कारभार बघणारा एक समाजवर्ग आहे.तर दुसरीकडे ती समाजात आत्मसन्मानाने जगावी यासाठी प्रयत्न करणारा देखील समाज आहे.

    पण हा फोटो यातूनही अनोखा आहे.ही एक क्रांती आहे.जी कितीतरी डोळ्यांना प्रकाशाच्या वाटेकडे ओढते.निवडणुकीत विजयी झालेल्या नवऱ्याला खांद्यावर घेऊन मिरवणारी बायको….ते ही गावातून.क्या बात है! लोकांचा गोड गैरसमज आहे की,शहरातल्या बायका पुढारलेल्या असतात म्हणे.पण हाच फोटो कितीतरी गोष्टी बोलून जातोय.गावातल्या बाईला पण समजतो तो निवडणूकीचा विजय,ते यश,पॅनल,समानता,लिंगभाव आणि खरा आनंद!!!!