पत्रकारांनी वास्तविक लिखाण करावे -माजी नगराध्यक्ष डॉ. एस.एस.शेंगूलवार यांचे प्रतिपादन

33

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

कुंडलवाडी(दि.20जानेवारी):-सध्या पत्रकारीता क्षेत्रात काम करतांना पत्रकारांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातही पत्रकारांनी वास्तविक व सत्य लिखानावर भर द्यावे तरच समाजातील वंचित,अन्याय झालेल्या घटकांना योग्य न्याय मिळेल असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष डॉ. एस.एस.शेंगूलवार यांनी दर्पण दिन व महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित नगरपरिषद सभागृहात शहरातील पत्रकारांचा सन्मान व गौरव सोहळ्यात अध्यक्षीय समारोप करताना केले.
कुंडलवाडी नगरपरिषद व महाविकास आघाडीच्या वतीने दर्पण दिन व आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जंयतीनिमित्त दि.१७ जानेवारी रोजी नगरपरिषद सभागृहात शहरातील पत्रकारांचा गौरव व सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शहरातील पत्रकारांचा लेखणी,डायरी,शाल,श्रीफळ व पुष्पहाराने सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष डॉ. एस.एस.शेंगूलवार, प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा सुरेखा जिठ्ठावार, माजी नगराध्यक्ष भुमन्ना ठक्कुरवार,नरसिंग जिठ्ठावार,सोसायटीचे चेअरमन साईनाथ उत्तरवार, पानसरे महाविद्यालयाचे उपाध्यक्ष राजेश्वरराव उत्तरवार,काँग्रेस कमिटी तालुका उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक राजू पोतनकर,काँग्रेस शहराध्यक्ष प्रदिप अंबेकर, नगरसेविका प्रतिनिधी गंगाधरराव खेळगे,अशोक कांबळे,पोशट्टी पडकुटलावार, नगरसेवक शैलेश-याकावार, सचिन कोटलावार, नगराध्यक्षा प्रतिनिधी नरेंद्र जिठ्ठावार, नरेश सब्बनवार, काँग्रेस युवा शहराध्यक्ष सिराज पट्टेदार,भीम पोतनकर,सोसायटीचे व्हाईस चेअरमन काशीनाथ नरावाड,संजय पाटील खुळगे,साईनाथ दाचावार सोनु सब्बनवार यांच्यासह पत्रकार एन.जी.वाघमोडे, गणेश कत्रुवार, कल्याण गायकवाड, हरीष देशपांडे, माजीद नांदेडकर, हर्ष कुंडलवाडीकर,अशोक हाके,कुणाल पवारे, नागोराव लोलापोड, रूपेश साठे,अमरनाथ कांबळे, संतोष चव्हाण, माधव हाळदेकर,संतोष मेहरकर, दिगांबर लाडे,नागनाथ कोलबंरे आदी पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार कुणाल पवारे यांनी केले.