नागभीड येथील धनंजय चंदुभाऊ मेंढे याची NCC मार्फत राजपथ दिल्ली येथील गणतंत्र दिनाच्या परेडसाठी निवड

    42

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

    नागभीड(दि.20जानेवारी):- येथील धनंजय चंदुभाऊ मेंढे याची NCC मार्फत राजपथ दिल्ली येथील गणतंत्र दिनाच्या परेडसाठी निवड झालेली आहे.धनंजय नागपुरच्या सी पी.& बेरार महाविद्यालयात BBA करीत आहे. परेड च्या सरावासाठी तो दिल्ली पोहचला आहे. त्याच्या वडीलांचे नागभीड येथे तहसील कार्यालय परीसरात झेरॅाक्स दुकान आहे.

    याआधी नागभीडचाच प्रशांत पुंडलिकराव निनावे याची सुध्दा यापुर्वी निवड झाली होती. आता धनंजय च्या निवडीने पुन्हा एकदा नागभीडकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. परीसरात त्याचे अभिनंदन केल्या जात आहे.