भाजपा महिला मोर्चाच्या धुळे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष पदी सौ मनीषा शंकरराव खलाणे यांची नियुक्ती

30

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

धुळे(दि.21जानेवारी):- नेर येथील मागील गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक राजकीय तसेच समाजाच्या सर्वच क्षेत्रात तसेच महिला बचत गट व महिलांच्या इतर प्रश्नांसाठी सतत कार्यरत असलेल्या सौ खलाणे यांच्या कार्याची दखल घेऊन माजी कॅबिनेट मंत्री व विद्यमान आमदार जयकुमार रावल व माजी केंद्रीय मंत्री डॉ सुभाष भामरे यांच्या शिफारशी नुसार त्यांना भाजप जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबादारी देण्यात आली माजी मंत्री जयकुमार रावल, महिला जिल्हा अध्यक्ष सविता पगारे,जिल्हाध्यक्ष नारायण पाटील,जिल्हा सरचिटणीस किशोर संघवी,यांच्या हस्ते सदर नियुक्ती पत्र देण्यात आले सौ खलाणे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य असून नेर या मोठ्या गावाच्या माजी सरपंच आहेत त्यांना सावित्रीबाई फुले समाजरत्न पुरस्कार २०२० नाशिक येथे देण्यात आला आहे.

त्यांच्या नियुक्तीने माजी केंद्रीय मंत्री खासदार डॉ सुभाष भामरे,माजी मंत्री जयकुमार रावल,प्रदेश उपाध्यक्ष बबन चौधरी,माजी मंत्री अमरिषभाई पटेल,जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ तुषार रंधे,उपाध्यक्षा सौ कुसुमताई कामराज निकम, शिक्षण सभापती मंगलाताई पाटील,महिला बाल कल्याण सभापती धरतीताई देवरे,कृषी सभापती रामकृष्ण खलाणे,समाज कल्याण सभापती मोगरा पाडवी, जिल्हा परिषद सदस्य प्रा अरविंद जाधव,राम भदाणे,संग्राम पाटील,विरेंद्रसिंग गिरासे,सुधीर जाधव,शोभाताई हालोर,आशुतोष पाटील,हर्षवर्धन दहिते,सत्यभामा मंगळे, अभिलाषा पाटील,ज्योतीताई बोरसे,तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील माजी सरपंच शंकरराव खलाणे आदींनी अभिनंदन केले आहे.