नागपूर विभाग ग्रंथालय संघाच्या कार्याध्यक्षपदी हरिदास टेंभूर्णे तर प्रमुख कार्यवाहपदी भाऊराव पत्रे यांची अविरोध निवड

30

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.21जानेवारी):- नागपूर विभाग ग्रंथालय संघाची त्रैवार्षिक निवडणूक नेताजी मार्केट, धनवटे चेंबर्स जवळ,नागपूर येथे संपन्न झाली. नागपूर विभागाच्या नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया या सहा जिल्ह्यांतील ग्रंथालय संघाच्या मतदारांचा या निवडणुकीत सहभाग होता. ग्रंथालय संघाची निवडणूक अविरोध झाली. यामध्ये नागपूर विभाग ग्रंथालय संघाच्या कार्याध्यक्षपदी हरिदास टेंभूर्णे यांची अविरोध निवड झाली तर प्रमुख कार्यवाहपदी भाऊराव पत्रे यांची अविरोध निवड झाली.

इतर कार्यकारिणीमध्ये कार्योध्योपाक्षपदी चंद्रकांत पानसे, कोषाध्यक्षपदी विश्वनाथ बोदेले, कार्यवाहपदी प्रविण सरोदे, रविंद्र समर्थ, मारोती राऊत तर सहकार्यवाहपदी अमृत येऊलकर, अनामिका भुरे, रमेश गोमासे, शामराव शामकुंवर, सुभाष शेषकर यांची अविरोध निवड झाली.अविरोध निवडून आलेल्या सर्व पदाधिका-यांचे गजानन कोटेवार, अनिल बोरगमवार, जगदीश म्हस्के, गजानन आवळे, वासुदेव लेकुरवाळे, शिवकुमार शर्मा, विनायक अंजनकर आदींनी अभिनंदन केले आहे.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून किशोर वरभे यांनी काम पाहिले.