डॉ बाबासाहेब आंबेडकर नगरात स्वच्छता अभियान व श्रमदान कार्यक्रम संपन्

    32

    ✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

    धुळे(दि.21जानेवारी):- दि.२०/१/२०२१ रोजी नेहरू युवा केंद्र धुळे युवा कार्यक्रम व क्रिडा मंत्रालय भारत सरकार आणि वीरांगना झलकारी बाई कोळी महिला/युवा मंडळ यांच्या सयुंक्त विद्यमाने नकाणेरोड वरील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती स्थळ येथे परीसरातील युवक व महिलांना मार्फत स्वच्छता अभियान व श्रमदान कार्यक्रम राबविण्यात आला.

    महात्मा गांधी जी यांच्या १५० वा जन्मदिन उत्सव निमित्ताने नेहरू युवा केंद्र धुळे चे जिल्हा युवा अधिकारी श्री अशोक कुमार मेघवाल साहेब यांच्या मार्गदर्शन खाली आयोजित या कार्यक्रमात सर्वप्रथम परीसरातील युवक व महीलांनी सहभागी होऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तसेच परीसराची स्वच्छता करून बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण केला… यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून डॉ लिना महाले यांनी आरोग्य विषयी महत्व पटवून दिले… तसेच सौ शोभाताई ठाकरे यांनी उपस्थितांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.

    वीरांगना झलकारी बाई कोळी महिला /युवा मंडळाच्या सौ गीतांजली कोळी यांनी महात्मा गांधी यांनी दिलेला स्वच्छतेचा संदेश व महत्व याबद्दल माहीती देत जनजागृति केली… याप्रसंगी स्वच्छता अभियान मध्ये भाग घेणा-या युवकांचा गुलाब पुष्प तसेच पेन देऊन सत्कार करण्यात आला… तसेच उपस्थितांना अल्पोहार ही वाटप करण्यात आला… यावेळी मंडळाचे वैभवी कोळी, नेहा सैदाणे, रवींद्र कोळी, मयुर कोळी यांच्या सह श्रीमती सरला निकम, जयेश, वैभव, रोहित यांच्या सह परीसरातील युवक व महिला भगीनीं उपस्थित होत्या….