विकासकामे करून ग्रामपंचायतीला अधिक सक्षम करणार – ज्ञानेश्वरी कदम

26

✒️नितीन राजे(खटाव,जिल्हा सातारा- विशेष प्रतिनिधी)मो:-9822800812

सातारा(दि.२१जानेवारी):- ग्रामपंचायतीत सरपंचपदापासून सगळीकडे महिला दिसायला लागल्या आहेत. लोकशाही बळकट होण्यासाठी प्रत्येकाला मतदानाचा अधिकार असला तरी त्याचा योग्य वापर करून आपल्याला हवा तो आपल्या गावाचा विकास करणारा उमेदवार आपल्याला निवडता येतो.
समाजाने स्रीला नेहमीच दुजाभाव दिला. परंतु आता पुरुषांनी कमवायचे आणि स्त्रीने बसून राहण्याचे दिवस आता गेले आहेत. घरातील महिलेची भूमिका कोणत्याही कुटुंबात अतिशय महत्त्वाची असून पुढच्या पिढीला संस्कारी बनविण्याचे काम महिला करत असते. कोण काय बोलेल हे मला महत्वाचे नाही तर आपण गावाच्या विकासासाठी काय करतोय हे महत्वाचे आहे.

महिलांच आपल्या देशाचे भवितव्य आहेत यावर माझा ठाम विश्वास आहे. सस्तेवाडीच्या समस्त जनतेने मला गावाच्या विकासासाठी निवडून दिल्याबद्दल मि समस्त जनतेची तर आभारी आहेच परंतु फक्त जनतेचे आभार मानून चालणार नाही. तर मला गावाच्या विकासासाठी जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या ज्या विविध योजनेचा आपल्या सस्तेवाडी गावाला जास्तीत जास्त लाभ कशाप्रकारे घेता येईल.

तसेच जास्तीत जास्त शासकीय योजनेचा लाभ घेवून सस्तेवाडी ग्रामपंचायतीचा मान अधिक कशाप्रकारे उचलता येईल हे नक्की पाहिल आणि गावात जास्तीत जास्त विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेन.

सस्तेवाडीच्या समस्त महिलांसाठी सांस्कृतिक, सामाजिक,धार्मिक कार्यक्रम आयोजित करून महिलांसाठी स्वतंत्र व्यासपीठ तयार करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करून सस्तेवाडी गावाच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करत असताना ज्याकाही अडीअडचणी असतील त्या सोडविण्यासाठी पुढाकार घेऊन काम करत राहणार असल्याचे ग्रामपंचायत निवडणूकीत विजयी झालेल्या उमेदवार ज्ञानेश्वरी कदम यांनी यावेळी सांगितले.