ब्रम्हपुरी तालुक्यातील रनमोचन खरकाडा रस्त्याची दुरवस्था- डांबरीकरणाची मागणी

31

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रह्मपुरी(दि.21 लजानेवारी):- तालुक्यातील रनमोचन खरकाडा रस्त्याची दुरवस्था झाल्याने दोन्ही गावातील नागरिकांना कमालीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे गेल्या आठ – दहा वर्षा अगोदर या मार्गाचे खडीकरण करण्यात आले होते त्यानंतर डागडुजी कडे दुर्लक्ष केल्याने या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर उर्वरित बहुतांसी रस्त्यांचे रखडलेले काम पूर्ण होतील अशी अपेक्षा जनतेला होती मात्र हे सरकार सपशेल अयशस्वी ठरत असल्याचे स्पष्ट चित्र या रस्त्यांच्या बिकट परिस्थिती वरून लक्षात येत आहे.

सदर रस्त्याची इतकी दयनीय अवस्था झाली आहे की रस्त्यावर पूर्णतः गिट्टी उकडलेली असून रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत त्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या दुचाकी, सायकल चालविना-र्याना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्याचे त्वरित खडीकरण करून डांबरीकरण करण्यात यावे ये अशी मागणी रनमोचन खडकाडा येथील नागरिकांनी केली आहे.