पांजरेपार ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापित उमेदवारांना पराजीत करत शिवसंस्कार पॅनलच्या सौ.कल्याणी सागर साबळे बहुसंख्य मताधिक्याने विजयी

59

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि.21जानेवारी):-शिवसंस्कार पॅनलच्या माध्यमातून पहिल्यांदाच रिंगणात आपली प्रतिष्ठा आजमावतांना युवा उमेदवारांनी विजय संपादन केले आहे. चिमुर तालुक्यातील मौजा पांजरेपार ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसंस्कार पॅनलच्या युवा उमेदवारांनी प्रस्थापित उमेदवारांना पराजीत करत घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामधे प्रभाग क्रमांक ३ मधुन उमेदवार सौ. कल्याणी सागर साबळे यांनी एकुन झालेल्या मतदानाच्या ८४ टक्के मत मिळविण्यात यशस्वी झाल्या आहे.

तसेच उमेदवार श्री. रामचंद्र इस्तारी गोंगल यांना एकूण झालेल्या मतदानाच्या 83 टक्के मते मिळवून विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक 2 मधील उमेदवार श्री. राहुल नामदेव गुरपुडे यांनी 10 वर्षांपासून सरपंच असलेल्या दिग्गज व प्रस्थापित उमेदवारला 83 मतांनी धुळ चारत बहुसंख्य मताधिक्याने विजयी झाले आहेत व प्रभाग क्रमांक 2 मधील महिला उमेदवार सौ. आयशा शैलेश बंगाळे 74 मतांनी विजयी झाल्या आहेत.