स्त्री जातीत जन्माला येणे गुन्हा आहे का ?

39

भोकर तालुक्यातील मौजे दिवशी येथील 5 वर्षाच्या चिमुरडीवर सालगड्याने केलेला अमानुष अत्याचार माणुसकीला काळिमा फासवणारी घटना निंदनीय आहे…आम्ही या भयंकर घटनेचा तीव्र निषेध करतो…अशा जघण्य अपराधास कोणतीही सजा कमीच आहे…ठराविक अंतराने अशा घटना सातत्याने घडतच आहेत….हैदराबाद येथील प्रियंका रेड्डी,जम्मू येथील लहान मुलींवरील अत्याचार,दिल्ली येथील निर्भया प्रकरण…यासह अशा अनेक घटना सांगता येतील….काही घटना ह्या सरकारी यंत्रणेला दिसतच नाहीत.अशी वासनांध प्रवृत्ती समाजात मुखवटे धारण करून वावरत असते….समाज आज संकुचित विचारांचा होत आहे….

सामाजिक संवेदना बोथट होताहेत….समाजातील सर्व स्तरातील लोकांना जरब,भीती,नितीमूल्यांची चाड जाणवत नाही….
शेजारच्या मुलांना अधिकाराने कोणी दरडावले तर खपत नाही….मग अशाने लोकांचा सामाजिक वावर चुकीच्या दिशेने होतो….मागासवर्गीय व आदिवासी समाजावर शेकडो वर्षांपासून अनेक प्रकारे अन्याय अत्याचार झालेला आहे…होत आहे….त्याची जाहीर वाच्यता होत नाही…. हा भोग आमच्या नशिबी आलेला दैवी प्रकोप आहे… ही अजूनही दृढ श्रद्धा आहे…आयबायांची अब्रू ही राजरोसपणे अशी नीलाम होत असताना समाज मन देखील ढवळून निघत आहे….

लोकांचा आक्रोश व हळहळ हा त्या अजाण चिमुरडीचे प्राण परत आणू शकत नाही…..मात्र अशी प्रवृत्ती नष्ट व्हावी ….आणि यापुढे असे विचार जरी मनात आणले तरी उरात प्रचंड धडकी भरावी….अशी वचक व दहशत समाजात निर्माण व्हावी…..
5 वर्षाच्या चिमुरडीने कुणाचं काय वाईट केलं होतं म्हणून तिच्यावर ही वाईट वेळ आली…?मुलगी होणे हा गुन्हा आहे का…?का मुलीने आईच्या गर्भातच या जगाची परवानगी घेऊन जन्माला यावं…..?स्त्री हीच या जगाला चालवणारी जगनियंता आहे….तिच्या अस्तित्वाला,अस्मितेला नख लावण्याचा हा पाशवी डाव भयंकर अमानुष आहे….

आज विश्वास ठेवावा कुणावर….?स्त्री ही जन्मापासून मरेपर्यंत पुरुषाची बरोबरीची जोडीदार आहे….ती वडील,भाऊ,पती,मुलगा,मुलगी,नातेवाईक, यांच्या साथसंगतीने आयुष्य व्यतीत करत असते….तिचे पावित्र्य,सन्मान,अधिकार,समाज अजूनही तिला पूर्णपणे द्यायला तयार नाही….मादी समजून सारखी वासनांध नजर आज स्त्रीच्या देहावर न्याहाळत वासना चाळवली जात आहे….पाळण्यातून नेमकं बाहेर पडून स्वच्छंद फुलासारखे बागडणारे वय….या वयात आपल्यावर कोण…?का…?
व कशापायी अत्याचार करतो….?याची दूर दूरपर्यंत त्या निष्पाप जीवाला कोणतीही समज नाही…..अरे मूर्ख माणसा….!भला हा मानवाचा जन्म तुला लाभला…..त्या निष्पाप जीवाला छळन्याआधी….क्षणभर तरी तुला जन्म देणारी माय,बहीण,डोळ्यासमोर आली नाही का रे….?तुला मायेने,आस्थेने वागवलेल्या सर्व स्त्री जातीतील माता भगिनीं आठवल्या नाही का रे….?तुझ्यासारख्या मानवी देहातील पशूंना या भूतलावर जगण्याचा अधिकार नाही..

तुला येथील कायदा शिक्षा देईल तेव्हा देईल….मात्र तुझ्या कुळातील सर्वाना आज जिवंतपणी तू मारलास…..
पीडित कुटुंबावरील अन्यायाची कैफियत शासनाच्या सर्व स्तरातील यंत्रणेला कळाली पाहिजे….त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या निंदनीय घटनेचा धिक्कार, निषेध मोर्चा काढून आरोपीला तात्काळ कडक शिक्षा व्हावी म्हणून निवेदन दिले पाहिजे…..पीडित कुटुंबाच्या या दुःखद प्रसंगात आम्ही सोबत आहोत….अमानुष अत्याचारात बळी पडलेल्या बालिकेस माझी भावपूर्ण श्रद्धांजली…..🙏🙏💐💐

✒️लेखक:-दत्तात्रय अन्नमवाड
नांदेड(मो:-9860183370)