रनमोचन जि. प. शाळेत शहीद स्मृती दिन सोहळा संपन्न

    38

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

    ब्रम्हपुरी(दि.23जानेवारी):-तालुक्यातील बरडकिन्ही येथून क्रीडा संमेलन आटोपून विजय प्राप्त करीत ट्रॅक्टरने गावाकडे परत येत असताना रुई विद्यानगर जवळ 22 जानेवारी 1999 रोजी विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव मिनी ट्रकने ट्रॅक्टरला धडक दिल्याने रनमोचन शाळेतील विद्यार्थ्यांचा अपघात झाला होता. त्या घटनेत प्यारेनंद पंढरी शंभरकर, प्रदीप वामन ठाकरे, प्रकाश शंकर ठाकरे, शांताराम नवलाजी राऊत हे चारही बालक शहीद झाले होते. आजही तो दिवस शहीद स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो. आज दिनांक 22 जानेवारी 20 21 रोजी शुक्रवारला रनमोचन जिल्हा परिषद शाळेत शहीद बालक स्मृतिदिन कार्यक्रम संपन्न झाला.

    यावेळी या चारही बालकांना पुष्पहार घालून श्रद्धांजली वाहण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा शिक्षण समितीचे अध्यक्ष योगेश पिलारे होते. उपाध्यक्ष म्हणून शाळा शिक्षण समितीचे रेशम शंभरकर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून सदाशिवजी ठाकरे, शांतारामजी दोनाडकर, उषा मेश्राम, लक्ष्मीबाई दोनाडकर, नवलाजी राऊत, वामनजी ठाकरे, नवल शंभरकर, शंकरजी ठाकरे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक टेंभुने सर, झुरमुरे सर, रामटेके सर, मुंगले सर, किरमीरे सर, खोब्रागडे मॅडम गावातील प्रतिष्ठित नागरिक पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावकऱ्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.