उदयकुमार पगाडे “राज्यस्तरीय युवारत्न पुरस्कार-2021” ने सन्मानित

    43

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

    ब्रम्हपुरी(दि.23जानेवारी):- महाराष्ट्र राज्यातील सर्व सरपंचासाठी कार्यरत असलेल्या, सरपंच सेवा संघाच्या वतीने शिर्डी येथील हॉटेल जे.के.पॅलेस मध्ये दि.22/01/2021 शुक्रवारला राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा “मान कर्तृत्वाचा_सन्मान नेतृत्वाचा” आयोजित करण्यात आला होता..यामध्ये आपल्या राज्यातील सामाजिक, आरोग्य, क्रीडा, सांस्कृतिक, कृषी अश्या विविध प्रकारच्या क्षेत्रातील उल्लेखनीय लोकांची योग्य ती निवड करून, त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला.

    या सन्मान सोहळ्यात, आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरीचे युवा नेतृत्व, सामाजिक कार्यकर्ते मा.उदयकुमार सुरेश पगाडे यांना “राज्यस्तरीय युवारत्न पुरस्कार-2021” देऊन सन्मानित करण्यात आले.सदर सन्मान सोहळ्यात, शिर्डी मतदार संघाचे खासदार मा. सदाशिव लोखंडे, प्रख्यात समाज प्रबोधनकार मा.निवृत्ती इंदोरीकर महाराज, सरपंच सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस मा.बाबा पावसे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.