चांदा येथे शेळीपालन, कुक्कुटपालन आणि दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

30

✒️प्रा.रावसाहेब राशिनकर(अहमदनगर,विशेष प्रतिनिधी)मो:-9404322931

अहमदनगर(दि.23जानेवारी):-शेतकऱ्यांना तसेच सुशिक्षित बेरोजगारांना हमखास नफा देणारा व्यवसाय निवडण्याची सुवर्णसंधी महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र या संस्थेच्या वतीने देण्यात येत असून दुग्ध व्यवसाय ,कुक्कुट पालन, बंदिस्त शेळी पालन प्रशिक्षण कार्यशाळा दि. 23 व 24 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11 ते 4 या वेळेत द्रोणा अकॅडमी इंग्लिश मिडीयम स्कुल, संकेत इलेक्ट्रिकल्स समोर, लोहारवाडी रोड,चांदा, ता.नेवासा, जि.अहमदनगर येथे आयोजित करण्यात आली असून कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सोशल डिस्टंस, मास्क व सॅनिटायझरचा वापर करुनच प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न होईल.प्रत्येकाचे थर्मल स्क्रीनिंगवर तापमान तपासुनच प्रवेश दिला जाईल.

मर्यादित लोकांनाच प्रवेश असेल, प्रथम येणारास प्रथम प्राधान्य.प्रशिक्षणातील महत्वाचे विषय- शेळी/ कोंबडी/ गाय, म्हैस यांच्या जाती माहिती व निवड,चारा-पाणी व्यवस्थापन, गोठा व्यवस्थापन,आजार-उपचार व लसीकरण, शासकीय योजना व अनुदान,बँक कर्ज प्रकरणे व माहिती,प्रशिक्षणादरम्यान चारही व्यवसायाचे प्रमाणपत्र, सॅम्पल बँक अहवाल, शेडचा नकाशा,500 व्यवसायाचे माहिती पुस्तकं मिळेल.

आधिक माहिती व प्रवेश फी साठी 8408034326, 9404322931 या क्रमांकावर संपर्क साधुन अल्प प्रवेश फी मध्ये शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय या तीन व्यवसायांच्या एकत्रित प्रशिक्षणाचा गरजूंनी लाभ घ्यावा असे अवाहन ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राच्या वतीने करण्यात येत आहे.