प्रहार दिव्यांग संघटनेचा मुदखेड तहसील कार्यालयावर विविध मागण्या संदर्भात ठिय्या आंदोलन संपन्न

    41

    ✒️चांदू आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधी)मो:-9307896949

    नायगाव(दि.23जानेवारी):-2016च्या शासन निर्णया प्रमाणे दिव्यांगांना सर्वसामान्य नागरीकां सारखे जीवन जगता यावे म्हणून व 5% निधी, सं गां यो , मनरेगा, अन्त्योदय योजना या व अन्य मागण्यांसाठी प्रहार दिव्यांग संघटना मुदखेड च्या वतीने काल दि. 22 जानेवारी रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले व या आंदोलनाला तहसीलदार मा.श्री. दिनेश झांपले व नायब तहसिलदार मा.श्री. संजय नागमवाड यांनी प्रतिसाद देत तालुका स्थरावरील दिव्यांगांच्या अडचनी सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

    या आंदोलनाचे नेतृत्व प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा प्रमुख श्री. विठ्ठलरावजी मंगनाळे,जिल्हा अध्यक्ष श्री. पंढरीनाथ हुंडेकर, जिल्हा सचिव श्री. मारोती मंगरूळे ,साईनाथ बोईनवाड अध्यक्ष नायगाव, संगीता बामने गोळेगावकर अध्यक्ष उमरी तसेच या आंदोलनाचे आयोजन कर्ते श्री अनिल पा.शेट्टे, दिगंबर लोणे,साहेब निवडंगे,तुकाराम वरवळे महिला ता.अध्यक्ष केशरबाई शिंदे व शंकरराव शिंदे यांनी केले होते.