इनरव्हील क्लबतर्फे कालचक्र दर्पण दिनदर्शिकेचे प्रकाशन

93

✒️चोपडा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चोपडा(दि.23जानेवारी):- सेवा, कर्म व त्याग, मैत्री यांची यशस्वी परंपरा असलेल्या महिलांच्या वैश्विक संघटनेची शाखा – इनरव्हील क्लब ऑफ चोपडा तर्फे कालचक्र दर्पण-२०२१ दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार अनिलकुमार पालीवाल हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून भगिनी मंडळ संस्थेच्या अध्यक्ष तथा क. ब. चौ. उ. म. वि. च्या सिनेट सदस्य पुनम गुजराथी, महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील चौधरी, पत्रकार संजय बारी यांच्यासह क्लब प्रेसिडेंट शैला सोमाणी, डिस्ट्रिक्ट व्हाईस चेअरमन अश्विनी गुजराथी ,हे मंचावर उपस्थित होते. येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कालचक्र दर्पण -२०२१ दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. 

        यावेळी बोलताना मुख्याध्यापक सुनील चौधरी, पत्रकार संजय बारी यांनी क्लबच्या उपक्रमांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय मनोगतात अनिलकुमार पालीवाल यांनी क्लब सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करीत असून क्लब च्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात असल्याबद्दल प्रशंसा केली,क्लबच्या माध्यमातून महिलांना व्यक्तीमत्व विकास व समाजसेवेची ईच्छा पूर्तीसाठी सँधी असते. भविष्यकालीन वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन चेतना बडगुजर यांनी केले. कार्यक्रमास इनरव्हील क्लबच्या सीसी सौ.किरण पालिवाल, मीनाताई पोतदार, भारती बोरसे, पदाधिकारी, सदस्य व शिक्षक – शिक्षिका उपस्थित होत्या.