गंगाखेड तालुक्यात महिलांवर अत्याचार व विनयभंग प्रकरणी गुन्हे दाखल

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.24जानेवारी):-गंगाखेड तालुक्यातील खादगाव येथे एका महिलेवर अत्याचार तर नरळद येथे विनयभंग केल्याच्या वेगवेगळ्या दोन घटना घडल्याने दोन्ही घठनेत आरोपी विरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या बाबत सविस्तर माहिती अशी की,गंगाखेड तालुक्यात दोन गावात वेगवेगळ्या अत्याचार व विनयभंगाच्या घटना घडल्याने महिला वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे.तालुक्यातील खादगाव येथील एका २५ वर्षीय महिलेवर जीवे मारण्याची धमकीदेत तिच्यावर सतत अत्याचार केल्याप्रकरणी दि.२३रोजी दोघावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदर घटनेत पिडीत महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार २०२० पुर्वी व नंतर खादगाव येथील आरोपी रमेश शिंदे याने या पिडीत महिलेला जिवे मारण्याची धमकी देऊन अनेक वेळा अत्याचार केला.

दि.१७ जानेवारी रोजी पिडीत महिला व तिची बहिण व मेहुणा निळा शिवारात ऊस तोडणी करतांना तेथेही आरोपीने येऊन अत्याचार केला व दि.२०जानेवारी रोजी दुपारी २ वा.सदर महिला अँटोने निळा येथे जातांना वडगाव पाटीजवळ आरोपीने अँटो थांबवुन आपण पुण्यास पळुन जाऊ असे म्हटले,पिडीत महिलेने विरोध केला असता आरोपी शिंदेे व जयदिप कानडे यांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली.या बाबत पिडीत महिलेने पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रमेश शिंदे व जयदीप कानडे यांच्या विरुध्द गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास पोलीस करत आहेत.

तर दुसऱ्या विनयभंगाच्या घटनेत नरळद येथील पिडित महिलेच्या घरात गावातील एका नराधाम इसमाने घरात घुसुन विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची घटना दि.२१ जानेवारी रोजी रात्री ९ वाजेदरम्यान घडली.या प्रकरणी आरोपी विरुध्द महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तालुक्यातील नरळद येथील एका २६ वर्षीय विवाहितूच्या घरची मंडळी कामानिमीत्य बाहेर गेली असता गावातील एका ३७ वर्षीय नराधमाने घरी कुणी नसल्याचे पाहुण  २१ रोजी रात्री ९ वा.सुमारास घरात घुसुन वाईट हेतुने हात धरत आरडाओरड केल्याने हा नराधम इसम येथुन पळुन गेला असल्याची माहिती सदरील विवाहितेने घरच्या कुटुंबास दिलीत्यानंतर गंगाखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन धनराज टोंपे यांच्या विरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात असुन तपास पोलीस करत आहेत.तालुक्यात दोन घटना घडल्याने महिलावर्गात भितीचे वातावरण पसरले असुन आरोपीस तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED