मराठा आरक्षणाची बाजु राज्य सरकारतर्फे भक्कमपणे मांडावी ; छावाच्या राजेश मोरे चे ना.अशोकराव चव्हाण यांना साकडे

31

✒️उमरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

उमरी(दि.24जानेवारी):- महाराष्ट्रात सर्वाधिक वरचढ ठरत असलेला मुद्दा म्हणजे मराठा आरक्षणाचा…. मराठा समाजाने आरक्षण मिळवण्यासाठी 58 मुक मोर्चे, ठोक मोर्चे,चक्काजाम आंदोलन एवढेच नाहीतर 42 बांधवांचे बलिदान देऊन सुद्धा मागील फडणविस सरकारने आरक्षणाचे गाजर दाखवले.

आता महाविकास आघाडी सरकारने असे न करता मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावावा व पुढील सुनावणी च्या अगोदर मराठा समाजातील सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना ल मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांना आमंत्रित करुन बैठक घ्यावी व न्यायालयाच्या चौकटीत टिकतील असे भक्कम मुद्दे ठरवुन ते मुद्दे वकीलांनी न्यायालयात मांडावेत अश्या सुचना वकिलांना द्याव्यात अशी विनंती केली.

यावेळी छावाचे प्रदेशाध्यक्ष राजेश पाटील मोरे, मा. आ. वसंतरावजी चव्हाण साहेब,आ.मोहणअण्णा हंबर्डै,आ.अमरनाथ राजुरकर, राम पाटील कुदळेकर उपस्थित होते