बरबडा अंतरगाव रुई रस्त्याचे काम चालू : विक्रम पाटील बामणीकर

28

🔹अधिक्षक अभियंत्यांनी घेतली शिवराज्य संघटनेच्या निवेदनाची दखल

✒️माधव शिंदें(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नायगाव(दि.25जानेवारी):- तालुक्यातील अत्यंत वर्दळीचा रस्ता असलेला बरबडा अंतरगाव रुई या रस्त्याच्या कामाची सुरुवात एक वर्षा अगोदर करण्यात आली वर्षभरात फक्त रस्ता सर्वत्र खोदून ठेवून रस्त्याच्या बाजूला गिटीचे ठिका ठिकाणी ढगारे टाकण्यात आले पण रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात न झाल्यामुळे रस्त्यावरून प्रवास करण्यास नागरिकांना अत्यंत अडचणीचा सामना करून आपला जीव मुठी मध्ये धरून या रस्त्यावरून प्रवास करण्याची वेळ या परिसरातील नागरिकांना आली होती यासंदर्भात दि. ०७.०१.२०२१ रोजी शिवराज्य युवा संघटनेच्या वतीने अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ नांदेड यांच्याकडे बरबडा अंतरगाव रुई या रस्त्याचे काम तात्काळ चालू करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन देण्यात आले होते चालू न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असेही निवेदनात नमूद करण्यात आले होते या निवेदनाची दखल घेत अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ नांदेड यांनी या रस्त्याच्या कामात सुरुवात केली आहे.

त्यामुळे या रस्त्याचे काम लवकरात पूर्ण करावे व या परिसरातील रस्त्यावर भावी मरण यातना सोसणाऱ्या जनतेला दिलासा द्यावा अशी भावना विक्रम पाटील बामणीकर यांनी व्यक्त केली आहे या रोडचे काम सुरू झाल्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आपला आनंद व्यक्त करत हा रस्ता तात्काळ दुरुस्त करून आमच्या प्रवासाला व सुविधेला पाठपुरावा करून काम चालू केल्याबद्दल विक्रम पाटील बनकर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्यातच आता शाळेला सुरुवात झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी देखील समाधान व्यक्त केले आहे. पायी चालणे कठीण झाले होते कारण रस्त्याच्या बाजूला गिटिचे ढिगारे फोडून ठेवल्यामुळे व संपूर्ण रस्ता खोदून ठेवण्यात आलेला होता याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग मंडळ लक्ष देत नसल्यामुळे गुत्तेदाराची मनमानी कारभार चालत असल्याचे दिसून आले.

त्यासाठी शिवराज्य युवा संघटनेच्या वतीने अधीक्षक अभियंता साहेब सार्वजनिक बांधकाम मंडळ नांदेड यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे बरबडा अंतरगाव रुई या रस्त्याच्या कामाची तात्काळ सुरुवात करण्यात यावी व या रस्त्याचे काम लवकरात पूर्ण करण्यात यावे अन्यथा शिवराज्य युवा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा विक्रम पाटील बामणीकर जिल्हा प्रमुख यांनी दिला होता या निवेदनाची दखल घेत बरबडाअंतरगाव रुई रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात आली त्यामुळे या परिसरातील नागरिकांना प्रवास करण्यासाठी आता सोयीस्कर ठरल्याचे बोलल्या जात आहे.गेल्या अनेक दिवसापासून बरबडा अंतरगाव मनुर इज्जतगाव या परिसरातील जनतेला रस्त्या अभावी मरण यातना सोसाव्या लागत आहेत्या गेल्या पंधरा वर्षापासून बरबडा अंतरगाव रुई हा रस्ता अत्यंत खराब व रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती यामुळे प्रत्यक्षात रस्त्याचे काम चालू झाल्यामुळे या परिसरातील जनतेच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद दिसत होता पण गेल्या एक वर्षभरापासून या रस्त्यावर फक्त गिट्टी फोडून ठेवण्यात आली.

आहे व रस्तादेखील खोदून ठेवण्यात आला होता पण पुढे काम चालू करण्यात आले नसल्यामुळे या परिसरातील नागरिकांना पुन्हा एकदा रस्त्या अभावी मरण यातना सोसण्याची वेळ आली होती त्यामुळे या भागातील एकांदा पेशंट जर बीमार असेल तर त्यांना वेळेवर दवाखान्यात देखील पोहोचता येत नाही एवढा खराब रस्ता झाला असल्यामुळे या रस्त्यावरून दोन चाकी वाहन देखील चालवणे म्हणजे तारेवरची कसरत व जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून प्रवास करावे लागत होते त्यासाठी हा रस्ता तात्काळ सुरुवात करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले होते दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन रस्त्याच्या कामास तात्काळ सुरुवात करण्यात आली आहे. अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ नांदेड यांना देण्यात आले आहे दिलेल्या निवेदनावर विक्रम पाटील बामणीकर जिल्हाप्रमुख नांदेड भाऊसाहेब पाटील चव्हाण तालुकाप्रमुख नायगाव यांच्या स्वाक्षर्‍या होत्या त्यामुळे अधीक्षक अभियंता यांचे शिवराज्य युवा संघटनेच्या वतीने काम चालू केल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले आहे.