मा. तहसीलदार सो दहिवडी यांनी दिलेल्या अतिक्रमणधारकांवर कारवाई करणेचे आश्वसनानंतर शिंदी बु ग्रामस्थांचे सामूहिक आत्मदहन आंदोलन स्थगित

29
✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड-माण)मो:-9075686100

म्हसवड(दि.26जानेवारी):-बुद्रुवक येथील गट नंबर ६०० हि बौद्ध समाजाची सामायिक मिळकत असून या मिळकती वर काही अपप्रवृत्ती यांनी अतिक्रमण केले आहे ते मूळ मालकांच्या कब्जे वहिवाटीस अडथळा करीत आहेत. तसेच काहींनी महसुली अधिकारी याना हाताशी धरून आणेवारी जुळवित असतानां गैरप्रकार करून महसुली अभिलेख मध्ये अनेक चुकीचे बदल केले आहेत. या गट नंबर ६०० मधील ३ हेक्टर क्षेत्र “तुपेवाडी लघुपाटबंधारे योजना ” यासाठी अधिग्रहण होऊन कोणत्या हि प्रकारचा मोबदला मिळाला नाही.

या संपूर्ण गैरप्रकार बाबत सर्व कागदोपत्री पुरावे सादर करून मा.तहसीलदार सो. दहिवडी तसेच मा. उपविभागीय अधिकारी दहिवडी अनेक वेळा सनदशीर मार्गाने लेखी अर्ज करून दाद मागितली होती परंतु प्रशासनाने यावर आज अखेर कोणतीच ठोस कारवाई केली नाही. याचे निषेधार्थ प्रजासत्ताक दिनी सामुदायिक आत्मदहन करणेचा इशारा मा. उपविभागीय अधिकारी सो दहिवडी याना निवेदनाद्वारे देण्यात आला होता.
यावर तहिसलदार सो दहिवडी यांनी मा. मंडलाधिकारी मलवडी यांचे मार्फत गट नंबर ६०० बाबत ची स्थळ पाहणी आणि पंचनामा करून सदर अतिक्रमण व पोकळ नोंदी धारकांना या प्रकरणी नोटीस बजावले आहे व तात्काळ सुनावणी ठेवून संबंधितांवर उचित कारवाई करणेचे आश्वासन मा.तहसीलदार दहिवडी श्रीमती बाई माने यांनी आज त्यांचे दालनात झालेल्या चर्चेवेळी सर्व आंदोलन कर्त्यांना दिले आहे.
यावर शिंदी बु येथील गट नंबर ६०० मधील वंचित खातेदारांनी आपण आंदोलनापासून परावृत्त होत असलेच सांगितले यावेळी संदीप खरात (राजप) , रघुनाथ खरात ,अनुसया झेंडे, शशिकांत खरात, भास्कर खरात, आबू खरात ,संजय खरात, शंकर खरात आदी नागरिक उपस्तिथ होते उपस्तिथ होते.