भोकर / दिवशी बु.येथील चिमुकलीच्या बलात्कारी आरोपीला दिशा कायद्यानुसार 21 दिवसात फाशी द्या- टायगर ग्रुपचे नायगांव तालुकाध्यक्ष परमेश्वर कळसे यांची मागणी

34

✒️शिवानंद पांचाळ नायगांवकर(नायगाव प्रतिनिधी)मो:-९९६०७४८६८२

नांदेड(दि.26जानेवारी):-जिल्ह्यातील,ता.भोकर येथील मौजे,दिवशी ( बु )येथे पाच वर्षांच्या निरागस चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर पाशवी बलात्कार करून व तिचा खुन करून मृतदेह नदीपात्रात टाकले,सविस्तर असे की दिवशी बु. गावातील शेतकऱ्याची ५ वर्षांची निरागस चिमुकली आहे, दि.२० जानेवारी २०२१ रोजी दुपारी १२:०० वाजतापासून मुलगी घरी नसल्याने तिचा शोध घेणे सुरू केले, परंतु ती मिळाली नसल्याने कुटूंबीयांनी याबाबतची माहिती भोकर पोलीसात दिली.

तसेच शोध सुरू ठेवला असता त्यांच्या शेतात काम करणारा सालगडी वय ३५ हा नराधम मुलीला पळवून नेले,असावे असा शंयश व्यक्त होत असल्याने शोध मोहीम सुरूच ठेवली याच दरम्यान सायंकाळी त्या चिमुकलीचा नि वस्त्र व गंभीर अवस्थेतील मृतदेह दिवशी बु.पासून काही अंतरावर तेलंगणा राज्य सीमे सुधा नदी पात्रतात सापडला,हि दुदैवी घटना दुुपारी २:००ते ६:०० वाजता च्या दरम्यान घडली असून त्या नराधमास भोकर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे, सदरील प्रकरणातील आरोपी असलेल्या नराधमास तात्काळ नवीन दिशा कायद्यानुसार २१ दिवसात फाशीची शिक्षा देऊन पिडीत चिमुकली व तिच्या कुटूंबियास न्याय द्यावा.

अशी मागणी टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा. तानाजी भाऊ जाधव व टायगर ग्रुप नांदेड जिल्हाध्यक्ष मा.बाळू भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नायगांव तालुकाध्यक्ष परमेश्वर कळसे देसाई व सचिन कांदुर्के,अजय गडमवार, ज्ञानेश्वर रामपुरे, अरुण चौधरी, अविनाश रायकवाड, साईनाथ हिवराळे अदी टायगर ग्रुप सदस्यांनी मिळून मा. तहसीलदार साहेब कार्यालय नायगांव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे, अमानवी आहे,देशाच्या कानाकोपऱ्यात दररोज अन्याय अत्याचार होत आहे, ही खेदाचीत बाब आहे.

त्यामुळे देशात व राज्यात महीला मध्ये भितीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे, जोपर्यंत अशा नराधमास फासावर लटकवून फाशी दिली जात नाही तोपर्यंत असे प्रकार थांबणार नाहीत यासाठी अस्या नराधमास तात्काळ नवीन दिशा कायद्यानुसार 21 दिवसात फासावर लटकवून फाशी दिली पाहिजे असे निषेधार्थ मत टायगर ग्रुप नायगांव तालुका अध्यक्ष परमेश्वर कळसे देसाई व टायगर ग्रुप उपस्थित सदस्यांनी आमच्या पुरोगामी संदेश न्यूजचे प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.