हिंगणघाट येथील चोरी प्रकरणातील आरोपीला केली अटक

34

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.26जानेवारी):- दिनांक 25/01/2021 रोजी 13.30 वाजता फिर्यादी सौ. सपना नरेश नव्हाते वय 32 वर्षे रा. छोटी वणी यांनी रिपोर्ट दिला की, सुभाष चौक हिंगणघाट येथील जगदीश मेडिकल येथे गेली असता एका अनोळखी महीलेने मागुन येवुन तीचे पर्स मधील 11000/- रु. चोरल्याने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे अप क्रमांक 97/2021 कलम 379 भा.द.वि. नोंद केला.

तपासामध्ये ठाणेदार श्री संपत चव्हाण यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोलीस हवालदार विवेक बनसोड यांनी त्यांचे पथकासह परीसरात लगेच शोध घेतला असता संशयीत आरोपी महीला नांदगाव चौरस्ता येथे मिळुन आल्याने आरोपी महिला नामे सौ. शिला दिपक राखडे वय 50 वर्षे रा. अशोक नगर, मांगगारोडी पुरा वर्धा हिस ताब्यात घेवुन तीचे जवळुन गुन्ह्यात चोरीस गेलेले 11000/- रु ची रक्कम जप्त करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.

त्याच प्रमाणे आरोपीस अधिक विचारपुस केली असता आॅगष्ट 2020 मध्ये सुद्धा हिंगणघाट शहरात असाच गुन्हा केल्याचे सांगीतल्याने अप. क्रमांक 476/2020 कलम 379 भादवि चा गुन्हा उघडकीस आणला आहे. आरोपीस अटक करण्यात आली असुन तपास सुरु आहे.

सदरची कार्यवाही श्री. प्रशांत होळकर पोलीस अधीक्षक, श्री. सोळंके अपर पोलीस अधीक्षक, श्री. दिनेश कदम उप विभागीय पोलीस अधिकारी, श्री संपत चव्हाण ठाणेदार यांचे मार्गदर्शनात पोलीस हवालदार विवेक बनसोड, सुहास चांदोरे, पंकज घोडे, प्रशांत वाटखेडे, अक्षया सावरकर यांनी केली.