कोरोनाच्या सावटाखाली 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा

29

✒️चांदू आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधी)मो:-9307896949

नायगाव(दि.27जानेवारी):-जिल्हा परिषद हायस्कूल कुंटूरच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. कोरोनाच्या धास्तीने प्रभातफेरीला फाटा देण्यात आला व सोशल डिस्टंसींगच्या नियमांचे पालन करण्यात आले होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजपूत सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या वेळी कुंटूर चे माजी सरपंच रुपेशजी गंगाधरराव देशमुख कुंटूरकर,शिवाजी पा.होळकर, सुर्यकांत पा.कदम, बाबुरावजी आडकिने, नागोराव भोसले,माधव डोके,हानमंत पुठ्ठेवाड,जयराम झुंजारे,तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण पा आडकिने, संतू संभाडे, मोहनराव महादाळे, रज्जाक गुजीवाले, डाँ.विलास चिंताके, मोहनराव होळकर, निळक़ठ आडकिने, माधव पा.कदम, अफरोज शेख,पवनकुमार पुठ्ठेवाड, अमीर शेख व गावातील बहूसंख्य प्रतीष्ठीत नागरिक सहभागी झाले होते.