वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठाणतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

    33

    ✒️नागभीड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    नागभीड(दि.27जानेवारी):सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक,साहित्य क्षेत्रात कार्यरत व गुणवंत विद्यार्थ्यांना नेहमी कौतूकाची थाप देणाऱ्या वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठाणतर्फे प्रजासत्ताकदिनाच्या पर्वावर दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित केले.कृषक विद्यालय,कोटगाव ता.नागभीड जि.चंद्रपूर येथील इयत्ता दहावीतील प्रथम,द्वितिय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठाणतर्फे सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

    इयत्ता दहावीत विद्यालयातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली स्नेहा सुनील वाघमारे (८५.४०%),द्वितिय क्रमांक प्राप्त तनुजा गणपत कावडकर (८५%),तृतीय क्रमांक प्राप्त संजना नरेश जांभुळे(८३.२०%) या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन विद्यालयाचे मुख्याध्यापक पानसे,टीचर्स करिअर एज्युकेशन सोसायटी कोटगांवचे सचिव डबले,संस्थेचे उपाध्यक्ष उईके,संस्थेचे सदस्य धोटे सर, जांभूळकर सर, काटेखाये सर, टेंभुर्णे सर, समर्थ सर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

    कार्यक्रमाचे संचालन कृषक विद्यालयाचे शिक्षक व प्रतिष्ठाणचे सदस्य प्रविण पिसे यांनी केले.आभारप्रदर्शन ठाकरे यांनी केले.कार्यक्रमाला शिक्षकवृंद,पालक,विद्यार्थी उपस्थित होते.सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष ॲड.भूपेशकुमार पाटील,सचिव सुरेश डांगे यांनी अभिनंदन केले आहे.