सह्याद्री सेन्ट्रीग काँट्रॅक्टर युनियन ने केला तंबाखूमुक्त जीवनाचा निर्धार

    39

    ✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    कोल्हापूर(दि.28जानेवारी):-सह्याद्री सेन्ट्रीग युनियन कोल्हापूर जिल्हा या संघटनेची स्थापना 26 जानेवारी चे औचित्य साधून करण्यात आली. जिल्ह्यातील जवळ जवळ100 हुन अधिक सेन्ट्रीग कामगारांच्या उपस्थितीत युनियन च्या फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी रक्तदान शिबिर हि घेण्यात आले.

    संघटनेने युनियन च्या उत्तम आरोग्यासाठी व्यसन मुक्तीचे व्याख्यान आयोजित केले होते.म. गांधी व्यसन मुक्ती पुरस्कार प्राप्त अद्यापक एकनाथ कुंभार यांनी उपस्थितांना तंबाखू, विडी, सिगार, मावा, गुटका अशा तंबाखू जन्य पदार्थांच्या सेवनाने मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम विशद केले. चित्र प्रदर्शनद्वारे तंबाखू सेवनाची घातकता स्पस्ट करून श्री कुंभार यांनी उपस्थितांना तंबाखू मुक्तीची शपथ दिली.

    यावेळी बऱ्याच सभासदांनी आपल्या खिशातील तंबाखूच्या पुड्या, चंच्या सुपूर्द करून संपूर्ण घर-परिसर व्यसनमुक्त करण्याचा निर्धार केला.सदर कार्यक्रम ज्ञान-विज्ञान माध्यमिक विद्यालय बिडशेड ता करवीर येथे संपन्न झाला. हा मेळावा व उपक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष पाटील मांडरे,वसंत पाटील गोठे, रवींद्र कांबळे सावर्डे दुमाला, संभाजी देसाई परखंदळे ,अध्यापक जयवंत शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.
    आभार संतोष पाटील यांनी मानले.