कंधार तालुक्यातील बामणी फाटा ते बामणी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी बांधकाम मंत्री ना. अशोकराव चव्हाण यांच्या विक्रम पाटील बामणीकर याची मागणी

29

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.28जानेवारी):-कंधार तालुक्यातील बामणी ( प.क.) हेगाव अत्यंत डोंगराळ भागांमध्ये असून या गावच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रस्त्याच्या कामासाठी व रस्ता दुरुस्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांची प्रत्यक्षात भेट घेवून शिवराज्य युवा संघटनेचे जिल्हाप्रमुख विक्रम पाटील बामणीकर यांनी आपल्या गावातील रस्त्याविषयी त्याच्यासमोर व्यथा मांडल्या व गेल्या वीस वर्षापासून बामणी येथील गावकऱ्यांना रस्त्या अभावी मरण यातना शोसण्याची वेळ आली आहे व हा रस्ता माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या कार्यकाळात हा रस्ता करण्यात आला होता गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे.

या ठिकाणी अनेकांनी आश्वासन दिले पण ते आश्वासन निवडणुका झाल्या की हवेत करुंगळे पण ते आश्वासन कोणीही पूर्ण केले नाही त्यासाठी नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष बांधकाम मंत्री नामदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्याकडे ही व्यथा मांडून प्रत्यक्ष निवेदन देऊन रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा व बामणी येथील गावकऱ्यांची रस्ते अभावी होणारी दैन्यावस्था दूर करावी व रस्त्या अभावी बामणी येथील गावकऱ्यांना दवाखान्यात जाण्याची वेळ आली तर वेळेवर दवाखान्यात देखील पोहोचता येत नाही आणि पेशंट असेल तर या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे तो दवाखान्यात देखील पोहोचू शकत नाही अशी या बामणी गावच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.

त्यासाठी बामणी येथील आमच्या माता-भगिनींना प्रसूतीसाठी दवाखान्यात जाण्यासाठी वेळेवर जाता येत नसल्यामुळे आमच्या गावातील भगिनींना ज्या ठिकाणी जवळ दवाखाना आहे अशा नातलगाकडे जाण्याची वेळ आली आहे त्यामुळे या रस्त्या अभावी नागरिकांना मरण यातना सोसाव्या लागत आहेत त्यासाठी महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री नामदार अशोकराव चव्हाण साहेब यांनी तात्काळ कंधार तालुक्यातील बामणी ( प.क. ) गावासाठी जाणाऱ्या रस्त्याच्या कामाला तात्काळ निधी उपलब्ध करून देऊन रस्त्या अभावी होणारी नागरिकांची दयनीय अवस्था थांबवावी अशा मागणीचे निवेदन बामणी गावचे सुपुत्र व शिवराज्य संघटनेचे नांदेड जिल्हा प्रमुख विक्रम पाटील बामणीकर यांनी नांदेड येथे बांधकाम मंत्री ना अशोकराव चव्हाण साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देण्यात आले यावेळी विधानपरिषदेचे आमदार अमरनाथ राजूरकर नांदेड दक्षिणचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे आमदार अंतापूरकर उपस्थित होते.

यावेळी बांधकाम मंत्री नामदार अशोकराव चव्हाण साहेब यांनी स्वतः निवेदन वाचून तात्काळ बामणी गावासाठी निधी उपलब्ध करून देऊन व गावकऱ्यांची रस्त्या अभावी दैनी अवस्था तात्काळ सोडण्यात येईल असे बांधकाम मंत्री ना अशोकराव चव्हाण साहेब यांनी यावेळी सांगितले त्यामुळे बामणी गावचे भूमिपुत्र विक्रम पाटील बामणीकर शिवराज्य संघटना जिल्हा प्रमुख नांदेड यांनी ना.अशोकराव चव्हाण साहेब बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री नांदेड जिल्हा यांचे आभार मानले.