रयत शेतकरी संघटनेचे पाथर्डी तालुका अध्यक्ष कराड अजिनाथ लक्ष्मण यांची निवड

111

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.29जानेवारी):- अँड रविप्रकाश उर्फ बापुसाहेब देशमुख साहेब संस्थापक अध्यक्ष रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार व जेष्ठ मार्गदर्शक तथा रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष तय्यब पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर पाटिल आणि विभाग प्रमुख सुखदेव भालेराव यांच्या शिफारशी ने आज कराड अजिनाथ लक्ष्मण यांची रयत शेतकरी संघटना पाथर्डी तालुका प्रमुख या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

तरी आपण पदावर काम करत असताना निपक्षपणे सर्व सामान्य जनतेसाठी तळागाळातील माणसाच्या हक्कासाठी काम करत राहावे. जेणेकरून रयत शेतकरी संघटना वाढीसाठी व संघटनेला गालबोट लागेल असे कुठलेही काम न करता गोरगरिबांसाठी काम करत राहावे. व जिल्हा भर गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर सोबत राहावे अशी अपेक्षा रयत शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या कडून व्यक्त होत आहे. नियुक्ती पत्र देताना गेवराई तालुका अध्यक्ष गणेश ढाकणे व सर्व पदाधिकारी आदी उपस्थित होते.