खासदार धानोरकरांनी सुचविलेल्या समस्या त्वरित मार्गी काढा – घनश्याम मुलचंदानी

38

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.29जानेवारी):-चंद्रपूर लोकसभा अंतर्गत मध्य रेल्वे विभागाअंतर्गत अनेक समस्या व लोकोपयोगी कामे त्वरित मार्गी लावावे अशी मागणी लोकप्रिय खासदार बाळू धानोरकर यांनी मध्य रेल्वे च्या महाप्रबंधकांना केली. महाप्रबंधक मध्य रेल्वे मुंबई यांचा चंद्रपूर रेल्वे स्थानकावर आज ता. २९ जानेवारी २०२१ ला निरीक्षण दौरा झाला. लोकसभा अधिवेशनात व्यस्त असल्याने खासदार बाळू धानोरकर यांच्या तर्फे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ श्री, संजीव मित्तल महाप्रबंधक यांना भेटून खासदार बाळू धानोरकरांनी सुचविलेल्या समस्या त्वरित मार्गी काढा असे माजी नागराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी यांनी विविध मागण्याचे निवेदन त्यांना दिले.

यावेळी भद्रावती रेल स्थानकावर स्टोपेजेस पूर्ववत सुरु करा, हैद्राबाद – निजामुद्दीन (दक्षिण एक्सप्रेस -०२७२१) भडक स्टेशन TIME (BUX) 6-10 AM, निजामुद्दिन – हैद्राबाद (दक्षिण एक्सप्रेस – ०२७२२) भांदक स्टेशन TIME (BUX) २०१५ PM DALY WEEKLY 2 DAYS, चेन्नई लखनउ- चेन्नई एक्सप्रेस ०६०९३ (मद्रास – लखनउ) भांदक स्टेशन TIME (BUX) २३.०५ PM, लखनउ – चेन्नई एक्सप्रेस ०६०९४ (लखनउ- मद्रास) भांदक स्टेशन TIME (BUX) १३.२० PM, व्हाया बल्लारपूर ते भुसावळ सेवाग्राम लीक एक्सप्रेस लवकर सुरु करा, काझीपेठ – पुणे एक्सप्रेस लवकर सुरु करा, ताडोबा एक्सप्रेस ला लवकर सुरू करावी, गेट न ३६ च्या जवळ पाणी साचत असल्याचे रस्ते बंद होण्याच्या तक्रारी लवकरात लवकर दूर करावी, मध्य रेल्वे अंतर्गत तिसऱ्या लाईनला गती देणे, त्यासोबतच बाबुपेठ उडाणपूलाच्या कामाला गती देऊन तो त्वरित पूर्ण करावा, तसेच घुग्गुस येथील राजीव रतन पुलाचे बांधकाम देखील त्वरित पूर्ण करावे अश्या लोकहितकारी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

त्यासोबतच बल्लारपूर रेल्वे स्थानकावरील फूट ओव्हर ब्रिजवर पथदिवे, पश्चिम दिशेने तिकीट घर, ६० वर्ष जुने स्टाफ कॅन्टीन पूर्ववत सुरु करणे, हावडा जाणारी ट्रेन व्हाया बालारपूर चालविणे इत्यादी मागण्या व समस्या खा. बाळू धानोरकर यांचे मार्फत गेलेल्या शिष्ट मंडळाने महाप्रबंधकाकडे मांडल्या.
या शिष्टमंडळात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य घनश्याम मुलचंदानी, बल्लारपूर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष अब्दुल करीम शेख, भास्कर माकोडे, डी आर यु सी सी मेंबर जय करण सिंग बजगोती यांचा समावेश होता.