✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986
चंद्रपूर(दि.30जानेेवारी):- जिल्ह्यात मागील 24 तासात 22 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 19 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 68 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 545 झाली आहे. सध्या 132 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 99 हजार 809 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 74 हजार 621 नमुने निगेटीव्ह आले आहेत.जिल्ह्यात आतापर्यंत 391 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 353, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 15, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.