रेवदंडा खाडी पुलावरून पडलेल्या तरूणीला वेळीचं मानसिक आधार व वैद्यकीय मदत करणार्या रेवदंडा-अलिबाग पोलिस स्टेशनच्या पोलिस नाईक अभियंती मोकल यांचा मनसेअलिबाग कडून सत्कार

29

✒️अलिबाग(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अलिबाग(दि.31जानेवारी):-सेल्फी’ काढण्याच्या नादात तोल जाऊन साळाव खाडी पुलावरुन खाली पडलेली 23 वर्षीय तरुणी पाण्यात पडल्यानंतर एका प्लॅस्टीक कॅनच्या सहाय्याने ती वाहत रात्री ८ च्या सुमारास आग्रावला पोहोचली. सुमारे दोन तास पाण्यातच असल्यामुळे अर्धबेशुद्ध अवस्थेत असलेल्या या मच्छिमारबांधवांनी पाण्याबाहेर काढुन तरूणीचे प्राण वाचविले व याबद्दल सदर तरूणांनी रेवदंडा पोलिस स्टेशनच्या पोलिस नाईक अभियंती_मोकल यांना माहिती दिली.

अभियंती मोकल यांनी परिस्थितीचं गांभिर्य ओळखुन तरूणीला मानसिक आधार देत वेळीच वैद्यकिय सुविधा मिळण्याकरीता रेवदंडा ग्रामिण रूग्णालयामध्ये दाखल केलं याबद्दल मनसे अलिबाग- मुरूड तालुकातर्फे पोलिस नाईक अभियंती_मोकल यांचा सत्कार करण्या आला.

यावेळी अलिबाग तालुका अध्यक्ष श्री देवव्रत विष्णू पाटील यांच्या सोबत तालुका उपाध्यक्ष श्री कल्पेश चवरकर, रेवदंडा- मोठा कोळीवाडा शाखा अध्यक्ष प्रशांत वरसोलकर , आग्राव शाखा अध्यक्ष संदेश झळके आणि मुरूड तालुका अध्यक्ष श्री शैलेशजी खोत व मुरूड ता. सचिव श्री राजेश तरे आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.