आज सव्वा दोन लाख बालकांना दक्ष आरोग्य यंत्रणा देणार पोलिओचे डोस

28

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.31जानेवारी):-आज दिवसभरात जिल्ह्यातील 2 लाख 14 हजार 88 बालकांना पोलिओचे डोस देणार आहे. याअनुषंगानेच जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे तब्बल 3 लाख 66 हजार डोसेस प्राप्त झाले आहेत. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार यांनी आपली संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे.

देशात पोलिओचे लसीकरण 1978 मध्ये सुरु करण्यात आले. 1984 पर्यंत 40 टक्के बालकांना पोलिओ लसीकरण करण्यात यश मिळाले. सर्व बालकांना विहीत वयात प्राथमिक लसीकरण,नियमित एएफपी, सर्वेक्षण आणि पल्स पोलिओ लसीकरण मोहिम अंतगर्त 0-5 वर्षाखालील सर्व बालके संरक्षित करणे या तीन प्रमुख आधार स्तंभावर पोलिओ निर्मुलनाची यशस्वीता अवलंबुन आहे.