नेत्रतज्ञ डॉ.ज्योती सोमवंशी यांच्या मुळे अनेक गरजू व्यक्तींना मिळती दृष्टी. सेवा करणे हा उदेश

26

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.31जानेवारी):- गंगाखेड येथील जनाई नेत्र तपासणी केंद्र यांच्या मार्फत रूग्णांना उदगीर येथील नेत्रतज्ञ डॉ.ज्योती सोमवंशी यांचे दीपज्योती रुग्णालयात योग्य दरात शस्त्रक्रिया करण्यात येतात चेन्नई येथील दृष्टीदुत हा राष्ट्रिय पुरस्कार प्राप्त तसेच पन्नास हजार नेत्र शस्त्रक्रिया करण्याचा अनुभव यामुळेच गंगाखेड, पालम, व सोनपेठ या तीनही तालुक्यातून अनेक रुग्णांना दृष्टी मिळत असून त्यांच्या प्रयत्नातून अनेकाना दृष्टी मिळत आहे.

रुग्णांनाकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. या साठी जनाई नेत्र तपासणी केंद्र गंगाखेड यांच्या मार्फत रुग्णाना उदगीर येथे नेण्यात येथे व परत जनाई नेत्र तपासणी केंद्र गंगाखेड पर्यंत आणले जाते या साठी. डॉ.महेश समगे आणि त्यांची पूर्ण टीम सतत कार्यरत असते.