1 फेब्रुवारी रोजी पत्रकारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन

28

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.31जानेवारी):-महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सरचिटणीस राजू कुकडे यांच्यावर खासदार बाळू धानोरकर यांच्या गुंडांनी वरोरा येथील बोर्डा चौकात केलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ व त्या खासदारासह त्यांच्या गुंडावार पत्रकार सरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी घेऊन उद्या दिनांक १ फेब्रुवारी २०२० रोज सोमवारी सकाळी११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकारांचे एकदिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा चंद्रपूरच्या वतीने करण्यात आले आहे.

या एकदिवसीय धरणे आंदोलनाला डिजिटल मिडिया असोसिएशन, विदर्भ राज्य ग्रामीण व शहरी पत्रकार संघ व बहुभाषिक संपादक पत्रकार बहुउद्देशीय संघ चंद्रपूर यांचा जाहीर पाठिंबा राहणार असून या संघटनेचे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित राहणार आहे,

पत्रकारांवर होणारे भ्याड हल्ले हे नित्याचीच बाब बनली असून पत्रकारांमधे एकजूट नसल्याने राजकीय व अवैध धंदेवाईक हे पत्रकारांवर हल्ले करून पत्रकारांच्या हक्क अधिकारांचे हनन करीत आहे. त्यामुळे लोकशाहीचा चौथा स्तंभच दहशत मधे असेल तर सर्वसामान्य जनतेला न्याय कसा मिळेल? किंव्हा समाजात अराजकता माजली असताना व मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढले असताना त्यावर अंकुश कसा लावल्या जाईल? ही बाब अतिशय गंभीर असल्याने पुन्हा कुण्या गावगुंडाची हिंमत पत्रकारांवर हल्ला करण्याची होऊ नये व लोकप्रतिनिधीनी आपली मर्यादा पाळावी यासाठी हल्लेखोर व त्यांना हल्ला करण्याचा आदेश देणारा दोँघावर सुद्धा पत्रकार सरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा व त्यांना अटक करावी या मागणीसाठी उद्याच्या एकदिवसीय धरणे आंदोलनाला जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आव्हान महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष सुनील बोकडे, जिल्हा कार्याध्यक्ष जितेंद्र चोरडिया प्रदेश सदस्य प्रदीप रामटेके यांनी एका प्रशीद्धी दिलेल्या पत्रकाततून केले आहे.