कवी भोजराज कान्हेकर यांच्या धार लेखणीची या काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न

    39

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

    गडचिरोली(दि.1फेब्रुवारी):- येथील कवी तथा धम्म अभ्यासक भोजराज कान्हेकर यांच्या धार लेखणीची ह्या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन आरोग्य व वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री ना. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न झाले.

    काम्पलेक्समधील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या प्रकाशनाप्रसंगी माजी नगराध्यक्ष डाॕ. आश्विनी यादव ,ज्येष्ठ साहित्यिक बंडोपंत बोढेकर , डाॕ. रामकिरत यादव , सुरेंद्रसिंह चंदेल , कवी प्रमोद राऊत , राजुभाऊ कावळे , अरविंद कात्रटवार , राज गोपाल चिल्लावार , नंदू कुमरे , आश्विन कान्हेकर , कु. अपूर्वा कान्हेकर आदींची उपस्थिती होती .
    कवी भोजराज कान्हेकर यांच्या ह्या काव्यसंग्रहात एकूण ७० कविता समाविष्ट असून त्यात त्यांनी अंधश्रध्दा निर्मुलन , वैज्ञानिक दृष्टिकोन , पर्यावरण , गडचिरोली जिल्ह्याचे वैभव , शिक्षणाचे महत्त्व , सायकल व निसर्ग कविता , स्काऊट , बालपणीच्या आठवणी , भगवान बुध्द , छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा फुले , डाॕ. बाबासाहेब आंबेडकर आदी परिवर्तनवादी महापुरूषांच्या उल्लेखनीय कार्यावर रचना केलेल्या आहे.

    ह्या काव्यसंग्रहास ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांची दीर्घ प्रस्तावना लाभली असून मुखपृष्ठ चंद्रपूरचे सुप्रसिद्ध चित्रकार सुदर्शन बारापात्रे यांनी काढलेले आहे. तसेच कवी कान्हेकर यांनी प्रस्तुत काव्यसंग्रह आपल्या आईवडीलांना अर्पण केलेला आहे. शब्दजा प्रकाशन अमरावती यांनी सदर काव्यसंग्रहाची निर्मिती करून दिलेली आहे. याप्रसंगी ना. यड्रावकर यांनी कवी कान्हेकर यांच्या उत्तम काव्यनिर्मितीचे कौतुक करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्यात.