उसेगांवला रमाई घरकुल योजनेचा लाभ मीळणार तरी केव्हा ?

33

✒️नेरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नेरी(दि.1फेब्रुवारी):-वरून जवळ असलेल्या उसेगांव येथील अनुसुचीत जातीतील २०१८- १९ मधील ५२ पात्र लाभार्थ्याना रमाई आवास योजनेचे घरकुल मीळणार तरी केव्हा ? असा प्रश्न पात्र लाभार्थी करीत आहेत .

अनुसुचीत जातीच्या लाभार्थ्यासाठी रमाई घरकुल योजना राबवीली जाते .समाजकल्याण वीभागाकडुन
योजनेसाठी आराखडा तयार केला जातो .त्यातील पात्र लाभार्थ्याना १ लाख २० हजारांचा नीधी दीला जातो .नरेगा मधुन २० हजाराचा हातभार लावल्या जातो .पाच टप्यात हा घरकुलाचा नीधी दीला जातो .जील्हा ग्रामीण वीकास यत्रंणेकडुन या योजनेचे नीयत्रंण होते .अशी ही योजना आहे. उसेगांव ग्रामसभा ५/२/२०१९ ला रमाबाई घरकुल योजनेसाठी ५२ अनुसुचीत जातीतील कुटुबांची यादी ठराव क्रमांक – ३ नुसार ग्रामसभेत मंजुर करण्यात आली . या ५२ लाभार्थ्याना घरकुल योजनेचा लाभ मीळावा यासाठी पंचायत समीती चीमुर ला शीफारस करण्यात आली होती.

पण ह्या यादीचा ठराव उशीरा पंचायत समीतीला पोहचल्यामुळे पात्र लाभार्थ्याना घरकुल योजनेचा फायदा मीळु शकला नाही अशी पंचायत समीतीच्या अधीकाऱ्याकडुन सांगण्यात आले होते.२०२० मध्ये पात्र लाभार्थ्याकडुन ग्रामपंचायतनी फाईल मागीतल्या व त्या पंचायत समीतीला पोहचवील्याची सुध्दा माहीती आहे .पण २०२१ वर्ष लागुनही अजुनपर्यंत या ५२ लाभार्थ्याना रमाई घरकुल योजनेचा फायदा मीळालेला नाही .त्यामुळे पात्र लाभार्थ्यात प्रशासना वीरूद्ध रोष व्यक्त होत आहे .
…..पंचायत समीती मधील ग्रुह अभीयंता यांना उसेगांव येथील रमाई घरकुल योजना मंजुरी यादी बद्दल वीचारले असता त्यांनी असे सांगीतले की , रमाई आवास योजनेचे कोणतेही घर उसेगांवचे मंजुर झाले नाही .