गंगाखेड तालुक्यातील 50 टक्केच शेतकऱ्यांनी दिली पण महासंघाला पसंती

27

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.1फेब्रुवारी):-गंगाखेड तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या पणन महासंघाला 50 टक्केच पसंती दिली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीकडे एकूण 16370 शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली आसता, प्रत्यक्षात मात्र गंगाखेड पणन महासंघाच्या केंद्रावर फक्त 6119 शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी आनल्याची माहिती मिळाली आहे.

दिनांक 28 जानेवारीपर्यंत 1 लाख 73 हजार क्विंटल कापूस विक्रीसाठी आणला आहे. त्यापैकी कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत एकूण 12,112 शेतकऱ्यांना मोबाईल द्वारे संदेश पाठवण्यात आला होता. कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या वतीने शिल्लक असणाऱ्या शेतकऱ्यांना 5 फेब्रुवारीपर्यंत आपला कापूस पणन महासंघाच्या जिनिंगवर घेऊन यावे असे आव्हान करण्यात आले.

पण खासगी जिनिंगवर पणन महासंघाच्या खरेदी भावापेक्षा 50 ते 100 रुपये वाढून देत असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी पण महासंघाकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसत आहे. 5 फेब्रुवारी ही ऑनलाईन कापूस खरेदीसाठी नाव नोंदणी केलेल्या शेतकऱ्याची शेवटची तारीख असून 5 फेब्रुवारी नंतर कोणत्याही शेतकऱ्यांची काही तक्रार असल्यास त्याची दखल घेतली जाणार नाही असे प्रशासक संदिप तायडे व कृषी उत्पन्न बाजार समिती चे सचिव राजेभाऊ गायकवाड यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.