गंगाखेड कास्ट्राईब संघटनेच्या अध्यक्षपदी रमाकांत लाडके तर सचिवपदी विठ्ठल पंदनवड यांची निवड

32
✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.1फेब्रुवारी):-गंगाखेड तालुका कास्ट्राईब राज्य परिवहन मंडळ संघटनेच्या गंगाखेड तालुका अध्यक्षपदी रमाकांत लाडके तर सचिवपदी विठ्ठल पंदनवड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे .दिनांक 31 जानेवारी नीजामभाई यांच्या फार्महाऊसवर कास्ट्राईब संघटनेचे विभागीय सचिव राजकुमार दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेवुन नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.यावेळी विभागीयअध्यक्ष संतोष पालकुतवार सचिव देविदास दामोधरे , विक्रम पत्की, बी.पी. चव्हाण हे उपस्थित होते. खालील कार्यकारणीची निवड करण्यात आली.

अध्यक्ष म्हणून रमाकांत लाडके, उपाध्यक्ष अनिल थिट्टे, सचिव विठ्ठल पंदनवड,सहसचिव कैलास सावंत, कोषाध्यक्ष भिमराव माने, संघटक एम. एस.मुंडे, कार्याध्यक्ष मंदौडे आप्पा, यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सौ के.डी. गायकवाड, गौतम शेंडगे, विजय गायकवाड, बालाजी सावंत यांची नवीन सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
या संघटनेच्या माध्यमातून वाहक आणि चालक या कर्मचाऱ्यांचे निर्माण होणाऱ्या अडचणी संघटनेच्या माध्यमातून सोडविल्या जाणार असल्याची माहिती दिवटे यांच्या वतीने देण्यात आली. यावेळी कास्ट्राईब संघटनेचे बी.बी. राठोड ,बी. आर. माने ,एस.एम. कसबे, उमाजी डुमनर, सुनिल पवार, गौतम शेंडगे ,विजय गायकवाड, केजगीर एम. आर., किरण वाघमारे, रविकुमार मोते, एम. एस. मुंडे हे उपस्थित होते. बिनविरोध निवड झालेल्या कार्य करण्याचे यावेळी अभिनंदन करण्यात आले.