दिव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिका-याने वृद्धाश्रमात स्वत:चा वाढदिवस केला साजरा

    34

    ✒️दिवा(ईस्ट)(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    दिवा(ईस्ट)(दि.5फेब्रुवारी):-संतोष काॅम्पलेक्स,चौथा माळा मेट्रो हाॅस्पिटलच्या समोर,ठाणे जिल्हा दिवा (ईस्ट) या ठिकाणी ‘आपना घर’ या आनाथ वृध्दाश्रमात जाऊन,वृध्दांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिवा शहर ब्लॉक कार्याध्यक्ष श्री.सूर्यकांत कदम यांनी स्वतःचा वाढदिवस केक कापुन साजरा केला .यावेळी त्यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा करताना आनाथांनाही आपल्या आनंदात सहभागी करून त्यांना मदत करा असे आवाहन केले.

    वाढदिवसाच्या निमित्ताने वृध्दांना भोजन आणि वाढदिवसाला वायफळ खर्च न करता,तोच खर्च आर्थिक मदत म्हणून त्यांनी वृद्धाश्रमात देणगी दिली.हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिवा विभागाचे नेते तथा ठाणे जिल्हा चिटणीस मा.मनोज कोकणे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तर श्री.निलेश कापडणे (दिवा शहर ब्लॉक अध्यक्ष) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.या प्रसंगी आपना घर या वृध्दाश्रमाचे सेक्रेटरी डाॅ.महेंद्र पवार यांनी श्री.सूर्यकांत कदम यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

    प्रसंगी पक्षाच्या सविताताई जाधव (दिवा शहर महिला कार्याध्यक्षा), कविताताई काळेपाटील(दिवा प्रभाग क्र.27 महिला अध्यक्षा), पुजाताई मोहिते (दिवा शहर ब्लॉक युवती अध्यक्षा),शितलताई लाड (दिवा शहर ब्लॉक युवती कार्याध्यक्षा),भावनाबेन दावडा (दिवा महिला प्रभाग क्र.28 ‘अ’ अध्यक्षा) तसेच जेष्ठ कार्यकर्ते अजित केदारे,हिमांशु कदम उपस्थितीत होते.शेवटी आपना घरच्या अध्यक्षा ज्यांसीताई राणी यांनी सर्वांचे आभार मानले.विशेष म्हणजे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष (जिल्हा) मा.आनंद परांजपे यांनी ठाणे येथील पक्षाच्या मुख्य जनसंपर्क कार्यालयात श्री.सूर्यकांत कदम यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन,सत्कार केला व मोलाचे मार्गदर्शन केले.