अडाणचोट, असंवेदनशील भारतीय सेलिब्रिटी

28

घरातलं भांडणं, चारभिंती ओलांडून चौकात गेल्यावर ते घरगुती रहातं नाही.त्याला सार्वजनिक स्वरुप प्राप्त होते…!!बाहेरची व्यक्ती जेव्हा तुमच्या प्रश्नावर बोलू लागली तेव्हा तो प्रश्न सार्वजनिक झाला हे सुज्ञ व्यक्तीला सांगायची गरज रहात नाही…!!चौकात जाऊन भांडायचं आणि वरुन इतरांना म्हणावे की, आमच्या घरगुती बाबीत तुम्ही लुडबुड करू नये हे अडाणचोटपणाचे लक्षण आहे…!!

शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात भारतीय सेलिब्रिटींनी आमच्या अंतर्गत प्रश्नात नाक खुपसू नये असा साळसूद सल्ला देणारा सोशल मीडियावर ट्रेड चालविला आणि आपल्या अडाणचोटपणाचे प्रदर्शन केले आहे….!!जग हे ग्लोबलं खेडे झाले आहे ही बाब भारतीय सेलिब्रिटींना माहिती नाही म्हणूनच ते अडाणचोट आहेत असे वाटते…!!रिहाना या अमेरिकन पॉपस्टार ने ट्विट करतांना जो संदर्भ दिला तो समजून घेतला पाहिजे…!!

आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी सीएनएन या वृत्तसंस्थेने शेतकरी आंदोलनावर लेख लिहिला त्या लेखाचा संदर्भ देऊन रिहाना या अमेरिकन पॉपस्टार ने ट्विट केले आहे…!!शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी सीएनएन लेख लिहू लागली मग शेतकरी आंदोलन अंतर्गत बाब कशी राहिली…??कॅनडाचे पंतप्रधान शेतकरी आंदोलनावर त्यांच्या संसदेत वक्तव्य करतात मग शेतकरी आंदोलन ही अंतर्गत बाब कशी राहिली…??शेतकरी आंदोलनासाठी ग्रेट ब्रिटन मधील १००खासदार संसदेत निवेदन देतात मग ती बाब अंतर्गत कशी राहिली…??अमेरिकेन सरकार टिप्पणी करीत म्हणते शेतकरी आंदोलन मानवतावादी दृष्टिकोनातून सोडवा मग ती अंतर्गत बाब कशी राहिली…??

पर्यावरणवादी कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग अमेरिकेन प्रसिद्ध पॉपस्टार रिहाना आणि अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिश यांची पुतणी मीना हॅरिश अशा वेगवेगळ्या लोकांनी जागतिक पातळीवर शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात मत व्यक्त केल्या जाते आहे आणि तरीही तो प्रश्न आमचा अंतर्गत बाब आहे अशी भाबळी आवई कुणी ऊठवतं असेल तर त्यांना अडाणचोट नाही म्हणणार तर काय म्हणावे…??भारतीय सेलिब्रिटी केवळ अडाणचोटचं नाही तर असंवेदनशील देखील आहेत, गेल्या चार महिन्यांपासून शेतकरी आंदोलन देशात सुरू आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची धग पोहोचली मात्र भारतीय सेलिब्रिटींना त्याची खबर नाही आणि त्यावर व्यक्त होण्याची यांना गरज वाटली नाही मात्र जेव्हा रिहाना, ग्रेटा थनबर्ग आणि मीना हॅरिश यांनी मतं व्यक्त केले त्यावेळी यांना लाळघोटेपणा करावा वाटला यांच्या संवेदना बोथट झाल्या आहेत हे असंवेदनशील आहेत हेच यावरुन सिद्ध होते…!!भारतातील मुठभर ऊच्चभ्रू लोकांच्या असंवेदनशीलतेचा एक नमुना असा आहे की,….जुन्या काळी ब्राम्हणांच्या कुटुंबातील तरुण मुली विधवा झाल्या तर त्यांचे “केसवपन” करुन म्हणजे त्यांची हजामत करुन त्यांना कुरुप करुन ठेवले जातं असे त्यांना घराबाहेर पडता येतं नसे,त्यांचं जगणं म्हणजे नरक यातना भोगल्या सारखं होतं त्यांना पुणर्विवाह करण्याची बंदी होती.

त्या अनिष्ट रूढी बाबत म.फुले यांनी पुण्यात नाभिकांचा संप घडवून आणला आणि आम्ही ब्राम्हणांची हजामत करणार नाही अशी नाभिकांनी भुमिका घेतली तेव्हा ब्राम्हणांनी विधवांचे “केसवपन” करणारं नाही असे म्हणून सुटका करून घेतली…!!विधवांचे केसवपन हेही ब्राम्हणांच्या घरातील अंतर्गत बाब होती मात्र तो मानवतावादी मुद्दा म.ज्योतिबा फुले यांनी सोडवून स्त्री मुक्तीच्या लढा लढला,त्यावेळीही सचिन तेंडुलकर,लता मंगेशकर,विराट कोहली यासारख्या भारतीय सेलिब्रिटींचे पुर्वज विधवांचे “केसवपन” ही आमची अंतर्गत बाब आहे अशी मल्लीनाथी करीत होते…!!तीच असंवेदनशीलता आणि अमानुषता अनुवंशिकतेने या सेलिब्रिटींच्या अंगी मुरलेली आहे सबब हे अडाणचोट आणि असंवेदनशील आहेत…!!
जयभीम.

✒️लेखक:-प्रा.भास्कर भोजने.
( पुरोगामी चळवळीचे भाष्यकार,विचारवंत, राजकीय विश्लेषक,जेष्ठ मार्गदर्शक अकोला)
मो- 99602 41375

▪️संकलन:;राहुल कासारे
( घाटनांदूर सर्कल अंबाजोगाई प्रतिनिधी)
मो- 97634 63407