किसान आंदोलन

    43

    कितीही भिंती उभारा तुम्ही
    आम्ही शांतीने लढत राहू.
    कितीही किले बनवा तुम्ही
    आमचा आवाज बुलंद करू….

    कितीही फौज पाठवा तुम्ही
    आम्ही संविधानाने न्याय मागू.
    कितीही समस्या निर्माणा तुम्ही
    आम्ही त्यांना दूर करू….

    देश कुणाच्या बापाचा नाही
    आम्ही तिरंग्याची आण राखू.
    तुमच्या फसव्या नीतीतत्वाचा
    एक होऊनी निषेध करू….

    आजा़द भारताचे आम्ही किसान
    सूर्ययुगाशी दोस्ती करू.
    बाबासाहेब व भगतसिंगाच्या क्रांतीची
    मशाल आम्ही प्रज्वलीत करू…

    देश गुलाम करणाऱ्यांनो
    आम्ही लोकशाही तत्वाने लढू.
    अंत आमचा पाहू नका
    आम्ही देशासाठी प्राण देऊ..

    कितीही बँरेकट्स लावा तुम्ही
    आम्ही भारताचे गीत गाऊ.
    किसान आंदोलन नव्या युगाचे
    आम्ही अखेर विजयी होऊ…..

    ✒️संदीप गायकवाड
    ९६३७३५७४००