राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी आणि पदवीधर यांची महत्वपूर्ण बैठक

37

🔹पदवीधरचे आमदार अरुण लाड माळशिरस दौऱ्यावर

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.6फेब्रुवारी):-पुणे पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय व लाडके राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड यांचा शनिवार दिन. 06/02/2021 रोजी सकाळी 11 वाजता माळशिरस येथील संत सावतामाळी मंगल कार्यालय या ठिकाणी अरुण लाड यांचा भव्य नागरी सत्कार व राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची आणि पदवीधर यांची महत्वपूर्ण बैठक होणार असल्याचे माळशिरस नगरपंचायतचे नगरसेवक मारुतीराव उर्फ आप्पासाहेब देशमुख यांनी बोलताना माहिती दिली.

माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार पहिल्यांदाच येत असल्याने त्यांचा नागरी सत्कार माळशिरस तालुक्याच्या व पदवीधर यांच्यावतीने माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. आमदार अरुण लाड यांच्या उपस्थितीत माळशिरस तालुक्यातील पदवीधरांची महत्वपूर्ण बैठक आयोजित केलेली आहे. तरी माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्था, दूध संस्था, मजूर संस्था, चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, सभासद व पदवीधर यांनी उपस्थित रहावे असे आवाहन नगरसेवक मारुतीराव उर्फ आप्पासाहेब देशमुख यांनी संयोजन समितीच्या वतीने केलेले आहे.