भा ज पा कोरपना तालुक्याच्या वतीने विद्युत महावितरण विरोधात ताला ठोक व हल्लाबोल आंदोलन

    47

    ✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-९६२३८९६५७४

    कोरपना(दि.6फेब्रुवारी):-विद्युत महावितरण विरोधात हल्लाबोल आंदोलन श्री नारायण हिवरकर भारतीय जनता पार्टीचे कोरपना तालुका अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले प्रमुख उपस्थिती श्री सतीश उपलेंचवार शहराध्यक्ष गडचांदुर,श्री पुरुषोत्तमजी भोंगळे उपाध्यक्ष,श्री अरुण मडावी सरपंच श्री किशोर बावणे, श्री निलेश ताजने, श्री रमेश मालेकर, श्री हरीश घोरे, श्री नूतन कुमार जिवने पं समीती सदस्य, श्री अरुण डोहे नगरसेवक गडचांदूर, अमोल आसेकर नगरसेवक कोरपना, श्री संदीप शेरकी, श्री ओम पवार युवा मोर्चा जिल्हा सचिव, श्री दिनेश सुर,श्री अनिल कौरासे,दिनेश खडसे,अड पवण मोहितकर, शंकर चीनतंलवार, विठ्ठल तुमराम,आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

    श्री नारायण हिवरकर तालुका अध्यक्ष यांनी आपल्या मनोगतात महाराष्ट्र विद्युत महावितरणने 75 लाख वीज ग्राहकांना वीज कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील चार कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणाऱ्या महावितरणाच्या निषेधार्थ शुक्रवारी दिनांक पाच फेब्रुवारी 2021रोज शुक्रवार ला भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने ताला ठोक व हल्लाबोल आंदोलन मोठ्या आक्रोशाने, शासन विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. कोरोणा काळातील वीजबिल माफ करू म्हणून तत्कालीन उर्जामंत्री श्री नितीनजी राऊत यांनी जाहीर केले व एक वर्षाचा कालावधी लोटून सुद्धा विद्युत बिल माफ करणे सोडाच नागरिकांचे विज कनेक्शन कापण्याची नोटीसा सर्वसामान्य जनतेला पाठवलेली आहे यामुळे जनता भयभीत झालेली आहे महाराष्ट्र सरकारने हा चुकीचा निर्णय घेतलेला आहे.

    त्यांच्या विरोधात महाराष्ट्रातील जनता पेटून उठलेली आहे जर विज बिल त्वरीत माफ केले नाही तर कोणताही मोठा उद्रेक होऊ शकतो याला सर्वस्वी जबाबदार विद्युत महावितरण व महाराष्ट्र सरकार राहील करिता त्वरित वीज बिल माफ करून जनतेला दिलासा द्यावा असे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसीलदार साहेब कोरपना यांच्या तर्फे देण्यात आले आहे तसेच विद्युत महावितरण मंडळ कोरपना यांना देण्यात आले आहे असे मत व्यक्त केले तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले विद्युत महावितरण विरोधात व महाराष्ट्र सरकार विरोधात नारेबाजी करून घोषणाबाजी करण्यात आली भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते