दिल्ली येथील किसान आंदोलनाला समर्थन देण्यासाठी ब्रम्हपुरी येथील शिवाजी चौकात विविध पक्ष व संघटनांचे रास्ता रोको आंदोलन

49

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.6फेब्रुवारी):-दिल्लीच्या सीमेवर दोन महिन्या पेक्षा अधिक कालावधीपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची दखल न घेता त्यांचे आंदोलन हुकुमशाही ने दडपण्याचा प्रयत्न होत आहे.सरकार त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे म्हणून अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने 6 फेब्रुवारी 2021 रोजी देशव्यापी चक्का जाम आंदोलनाची घोषणा केली होती,त्या अनुषंगाने ब्रम्हपुरी येथे शिवाजी चौकात दुपारी बारा ते एक वाजता पर्यंत विविध पक्ष व संघटनाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करून,केंद्रातील मोदी प्रणित भाजप सरकारच्या विरोधात जोरदार नारेबाजी करीत मा.तहसीलदार विजय पवार यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती व मा.पंतप्रधान यांना निवेदन देऊन नव्याने पारित करण्यात आलेले शेतकरी विरोधी असलेले तीन कृषी कायदे ,वीज बिल विधेयक 2020 तसेच कामगार विरोधी सहिंता रद्द करण्याची यावेळी मागणी करण्यात आली.

यावेळी आंदोलनाचे नेतृत्व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ.विनोद झोडगे,राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष वासू सौंदर्कर,युवक नेते जगदीश पिलारे,वंचित बहुजन आघाडीचे नेते ड्रा प्रेमलाल मेश्राम, आय टक संघटनेचे तालुकाध्यक्ष विनोद राऊत,किसान सभेचे तालुकाध्यक्ष सुधीर खेवले,अश्विन उपासे,लीलाधर वंजारी,राहुल भोयर विनायक पारधी,महादेव बगमारे,विवेक नरुले,सुहास हजारे,पराग बंपुरकर,सागर हर्षे,गिरिधर गुरपुडे,दामोधर डांगे, दुधरा म आकरे,आदी विविध पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
डॉ.विनोद झोडगे म्हणाले की नव्याने पारित करण्यात आलेले कृषी कायदे शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे आहे.

न्याय हक्काच्या मागणीसाठी 73 दिवसा पासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे आंदोलन बदनाम करून केंद्र सरकार दडपशाही करत आहे रस्त्यावर बारिके ट, खिळे तर चक्क भिंत बांधून देशातील शेतकऱ्यांना रोखण्यासाठी एखाद्या सिमेसारखी परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे.हे हुकुमशाही चे दर्शन सरकारने घडविले आहे.जगभरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत असताना ,शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी केंद्र सरकार आडमुठेपणा चे धोरण सोडण्यास तयार नाही. ड्रा. प्रेमलाल् मेश्राम यांनी अनेक शेतकऱ्यांचे बलिदान जाऊन देखील सरकारला जाग आली नसून,देशातील शेतकरी पेटून उठला आहे.जगदीश पीलारे यांनी देशातील शेतकऱ्यांन चे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने शेतकऱ्यांचा हा उद्रेक आहे.हिंसक आंदोलन होण्यामागे केंद्र सरकार ची आडमुठे पणाची भूमिका जबाबदार आहे देशाच्या पोशिंध्यावर अन्यायाचा अतिरेक झाला असून ,देशातील शेतकरी परत एकजुटीने पेटून उठला आहे आणि तो या लढ्यात जिंकल्या शिवाय राहणार नाही असे ठासून सांगितले.केंद्रातील भाजप सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करीत आंदोलकांनी रस्त्यावर येऊन चक्का जाम आंदोलन केले.रास्तारोको आंदोलन करणाऱ्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली.