मुरलीधर नगर येथील रहीवाशांचे विविध नागरीसमस्यांचे नगरपालिका प्रशासनास निवेदनद्वारेसमस्या सोडविण्याची मागणी

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.6फेब्रुवारी):-मनमाड येथील मुरलीधर नगर आणि लक्ष्मण पार्क येथील रहिवाशांचे विविध नागरीसमस्यांबाबतचे निवेदन हे मनमाड नगरपालिका प्रशासनास देण्यात आले.गेल्या कित्येक वर्षांपासून येथील रहिवाशांना त्यांच्या घरातील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्यांची व्यवस्था नसल्याने येथील नागरिकांनी आपले घरातली सांडपाणी हे उघड्यावर सोडले आहे.या मुळे ठिकठिकाणी डबके तयार होऊन डास, दुर्गंधी होते.

या मुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.या परिसरतील रस्त्यांची अवस्था ही अतिशय खराब झाल्याने पावसाळ्यात पायी चालण्यासाठी देखील चांगला रस्ता नसतो , या परिसरात कचरा कुंडीची व्यवस्था नसल्याने येथील नागरिक हे घरातील कचरा हे उघड्यावर टाकत असल्याने परिसरात ठीक ठिकाणी कचरा जमा होऊन कचऱ्याचे साम्राज्य तयार होते ,घंटा गाडी देखील नियमित येत नसते. अशा विविध नागरी समस्यांन बाबतचे निवेदन हे मनमाड नगरपालिका प्रशासनास मुरलीधर नगर येथील रहिवाशांनी दिले.

गेल्या अनेक वर्षांपासून मुरलीधर नगर येथील रहिवाशी असणारे आणि अर्ज करते ‘रहीमखा कालोखा पठाण’ हे या समस्या पुर्ण होण्यासाठी नगर पालिका प्रशासनास निवेदन देत आहे परंतु आज पर्यंत यांच्या या निवेदना कडे दुर्लक्ष होऊन या समस्या पुर्ण झाल्या नसल्याने, मनमाड नगर पालिका प्रशासन आणि या परिसरातील नगरसेवक यांनी या समस्या लवकरात लवकर पुर्ण कराव्यात अशी मागणी या वेळी मुरलीधर नगर आणि लक्ष्मण पार्क येथील रहीवाशांनी निवेदनात केली आहे.यावेळी मनमाड नगर परिषद येथे निवेदन देण्यासाठी मुरलीधर नगर येथील रहिवाशी उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED