माता रमाई महिलांच्या प्रेरणा स्थान होतील काय?

32

मुलगी शिकली प्रगती झाली, आज सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून मान, सन्मान मिळवून नेतृत्व करीत आहेत, पण त्यांचे प्रेरणा स्थान कोण आहेत?.कष्टकरी महिलांचे प्रेरणा स्थान कष्टकरी महिला नेहमी आपल्या पतिदेवाला सर्वच कामात सतत मदत करीत असतात.अशा महिलांचे प्रेरणा स्थान म्हणजे माता रमाई.माता रमाई बाबत आज पर्यत अनेक प्रकारचे लिखाण हे भावनिकच झाले आहे.रमाबाईच्या कष्टाला, त्यागाला भावनिक केल्या गेले आहे.भिमराव आंबेडकर यांना जी साथ मिळाली ती भावनिक कधीच नव्हती ती पतीच्या कर्तव्य दक्षतेला मनापासुन पत्नीची साथ होती.ती प्रेरणा खेडया पडयातील व शहरातील झोपड़पट्टीत राहणाऱ्या कार्यकर्त्याच्या पत्नीनी घेतली म्हणुन ते आंबेडकर चळवळीतील प्रत्येक जन आंदोलनात पति पत्नी सहभागी होतात.विशेष ते सर्वच असंघटित कामगार असतात.पण असंघटित कामगार म्हणुन ते कोणतेही आंदोलन करीत नाही.त्याची त्यांना जाणीव नाही.

रमाबाई आणि भिमरावचे सर्व नातलग कोणते कामगार होते?. रमाबाई बदल जेवढा आदर अशिक्षित असंघटित महिला ठेवतात तेवढा सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणाऱ्या आणि सुरक्षित ठिकाणी राहणाऱ्या महिला ठेवत नाही.अशा महिला आपल्या पतीला बिनपगारी कोणतेही काम करू देत नाही.(देत असतील अशा त्या महिलांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांची माफी मांगुन )आज पर्यतचा इतिहास लिहतो.अन्यता आंबेडकर चळवळीत आज जी लेटरहेड वर जागणाऱ्याची जी संख्या आहे .ती राहली नसती. प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे एका महिलाचा हात असतो तसाच एका अपयशी पुरुषा मागे एका महिलांचाचं हात असतो.मग घराघरात असलेल्या आंबेडकर चळवळीतील गटागटच्या नेत्यांच्या महिलाचे प्रेरणा स्थान कोणते?.

रमाबाई ह्या बाबासाहेब याच्या प्रत्येक आंदोलनात मनाने सहभागी होत्या पण शरीराने नाही.मुलगा आजारी आहे घरात पैसा अदला नाही.नवरा तिकडे समाजसेवा करतो. असे सहन करणारी महिला आज शोधून सापडणार नाही. त्या आजारात मुलगा मरण पावतो तरी ती महिला विचलीत होवुन नवऱ्या बाबत राईचा पर्वत बनवित नाही.परिस्थिती समजुन घेते.याला भावनिक मुद्दा कसा म्हणता येईल?.हा समंजस पणा, दूरदृष्टिपणा होता. त्याला दुरदुष्टी म्हणता येईल.हा मंत्र आज महिलांनी घेणे गरजेचा आहे.

आज समाज ज्या अवस्थेत आहे त्याच अवस्थेत त्याचे (बाबासाहेबाचे) कुटुंब आहे.त्याकाळी बाबासाहेब आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बदलावी यासाठी शिकत नव्हते तर समाजाची एकूण सर्व परिस्थिती बदलण्या करीता शिकत होते.हे माता रमाबाई समजू शकत होती. आजची एकही माता असा विचार करणारी दिसणार नाही.संपूर्ण देश बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात होता.गांधी पुण्याला उपोषणाला बसले तेव्हा ते त्यात मरणार. त्याचा संपूर्ण राग माझ्या समाजावर निघणार याची कल्पना बाबासाहेब यांना होती.पण रमाबाईची मानसिक परिस्थिती काय असेल.घरात आणि बाहेर होणाऱ्या चर्चा पेपरात येणारया बातम्या रमाबाईला अस्वस्थ करीत होत्या. काय वर्णन करून ठेवले आपल्या थोर विचारवंतांनी?.

रमाबाईचा जन्म कुठे झाला, आईवडील काय करता होते,घरची गरीब परिस्थिती तिचे,दुःख आजार यांचे वर्णन करणारे लेखक समाजाला काय संदेश देण्यासाठी लिहतात. बाबासाहेबांना रमाबाई ची कशी साथ होती त्यावर लक्ष केंद्रित करून लिहले पाहिजे, ते प्रेरणादायी होईल. नवरात्रात शारदा,सरस्वती,अंबिका,लक्ष्मी श्रीदेवी यांचावर लिहणारे कधी जन्म,मृत्यू, आईबाप,भाऊ बहीण,शिक्षण, संसार, नवरा,मुलगा मुलगी,सासु सासरे, त्याने गांव तालुका जिल्हा, राज्य यांचा उल्लेख कुठेच येऊ देत नाही. हिंस प्राणी वाहन कसे होते. यावर कधीच लिहल्या जात नाही. सर्व भर नवस,कडक उपवास, मनोभावे पूजा नेवैद्य यातुन होणार चमत्कार साक्षातकार प्रसन्नता यांचा किती मोठा प्रभाव आजच्या उच्च शिक्षित महिलांच्या वर आहे.हे सिद्ध होत आहे. आपण बाबासाहेबांची रमाई कशी सांगितली पाहिजे,कष्ट,त्याग आणि जिद्दीने पती मागे उभी राहणारी.

रमाबाईची रमाई कशी झाली किती लोकांना माहित आहे. बाबासाहेब शिक्षणा करिता आणि समाजाला मान सन्मान मिळवून देण्या करिता सतत ब्रिटिशांच्या बरोबर पत्रव्यवहार आणि गाठी भेटी घेत असत.असे एकदा राजगृहावर बाबासाहेब व रमाबाई राहत असताना त्यांना अचानक परदेशी महत्वाच्या कामानिमित्य जायचे होते.पण रमाबाईला एकटे सोडून कसे जाणार हा प्रश्न पडला होता.तेव्हा बाबासाहेबांनी आपल्या एक मित्र धारवाडच्या वराळे काका कडे रमाबाईला पाठवितात.

धारवाडचे वराळे काका मुलाचे वसतिगृह चालवीत होते त्याच्या आवारात नेहमी लहान मुले खेळायला येत असत.रमाबाईला दोनचार दिवसात मुलांचा लळा लागला.नेमके तीन दिवसा नंतर आवारात मुलाची किलबिलाट दिसली नाही.वराळे काका चिंतेत दिसतात.म्हणून रमाबाई काकानां विचारतात मुले दोन दिवसात आवारात खेळताना दिसत नाही.कुठे गेली का?. तेव्हा वराळे काका सांगतात दोन दिवस झाले मुले उपाशी आहेत त्यामुळे मुले खेळायला आले नाही.कारण अन्न धान्याचा निधी दर महिन्याला मिळत होता तो अजून मिळाले नाही. तो मिळाल्याला तीन दिवस लागतील.त्यामुळे मुलेही तीन दिवस उपाशी राहतील. वराळे काका अगदी कंठ दाटून ते सांगत होते.त्यामुळे रमाबाई घरात आपल्या खोलीत जातात थोड्या रडत बसतात.नंतर कापटातील डबा काढतात त्यातील सोन आणि सोन्याच्या हातात्तील बांगड्या काढून वराळेच्या हातात देतात.विका किंवा गहान ठेवून ह्या मुलाच्या जेवणाचा बंदोबस्थ करा .त्या नंतर मुले पोटभर जेवतात आणि खूप आनंदात राहतात.हे पाहून रमाबाई खूप आनंदी होतात.त्यामुळे सर्व मुले रमाबाईला रमाआई, रमाई म्हणून बोलायला लागतात.वराळे काकाच्या त्यावेळे पासून रमाबाईच्या रमाई झाल्या.

रमाबाईचे पतीनिष्ठ उदाहरण द्रुष्टी समोर ठेवून बाबासाहेब नेहमी जाहीरपणे सांगत असत. स्री हा समाजाचा अलंकार आहे.आपल्या कुटुंबाचे आणि कुळाचा नांव लैकिक स्रियाच्या शिलावरच अवलबून असतो. स्री हि जशी गृहिणी तशी सुसंस्कारित समाज निर्माण करणारी माता ही असते. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैवाहिक जीवनात सुरवात पासून शेवट पर्यंत रमाबाई नी हाल अपेष्ट,दुख गरिबी यांच्याशी सतत संघर्ष करीत राहिल्या त्यामुळे त्या नेहमी आजारी राहत होत्या, पण त्यांनी बाबासाहेबाकडे तक्रार केली नाही.अशा महिला आज समाजात कुठेच दिसणार नाही.खाण्यासाठी किंवा कपडा लत्ता मिळाला नाही तर आकांड तांडव करणारे महिला नवऱ्याला सोडायला कमी करीत नाही.

सिद्धार्थ हॉस्टेल वडाळा येथे राहणाऱ्या कार्यकर्त्यांची नांवे नजर खालुन घाला म्हणजे चळवळीतील कार्यकर्त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे त्यांच्या महिलांचे योगदान लक्षात येईल.म्हणुन माता रमाई आजच्या महिलांचे प्रेरणा स्थान होतील काय?. त्यावेळची परिस्थिती आजची परिस्थिती किती पटीने बदलली आहे.तेव्हा चळवळीकडे पैसा नव्हता पण जीवाला जीव देणारी माणस होती त्यांना त्यांच्या घरुन चटणी भाकर मिळत होती.आज पैसा असल्या शिवाय माणस येत नाही.आणि घरची चटणी भाकर त्यांना गोड लागत नाही.आता कष्टाला त्यागाला कुठे किंमत आहे.तेव्हा ती होती.म्हणुन अशा माता रमाई च्या जयंती निमित्त सर्व मातांना हार्दिक शुभेच्छा !.धन्यवाद !!!.

✒️लेखक:-सागर रामभाऊ तायडे(मो:;९९२०४०३८५९)भांडूप मुंबई