बारामतीच्या मेंढपाळांवर देवपिंपरीत हल्ला

30

🔺देवपिंपरी येथील मेंढपाळावर हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करून ३०७ चे गुन्हे दाखल करा धनगर समाजाची मागणी

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.7फेब्रुवारी):- बारामती जिल्ह्यातील खेड्या गावातील मेंढपाळ हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील देव पिंपरी गावात मेंढ्या घेऊन आले होते. तेव्हा तेथील माणसाने तुमच्या मेंढ्या आमच्या शेतात का ? आल्या म्हणून धारदार कुर्हाडीने हल्ला केला.

यावेळी एक महिला मेंढपाळ आणि एक पुरुष मेंढपाळ यांच्यावर धारदार कुर्हाडीने हल्ला केला. या हल्यात अंजली पोरे,गुळज पुरंदरे,मारुति रामसुल, हे गंभीररीत्या जखमी झाले बीड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.