भिम टायगर सेनेच्या वतीने पुसद येथे माता रमाई जयंती साजरी

30

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.7फेब्रुवारी):-भिम टायगर सेना शाखा पुसद यांच्यावतीने आज त्यागमूर्ती माता रमाई जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अँड. वाय.एम् जांभुळकर,हे होते. तर प्रमुख अतिथी किशोरदादा कांबळे, जिल्हा अध्यक्ष भिम टायगर सेना दिपक भवरे( विभागीय सचिव समता सैनिक दल),बाळासाहेब कांबळे हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माता रमाई यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले.

यावेळी सुप्रसिद्ध कवि-गायक प्रा.जनार्धन गजभिये यांच्या रमाईवरील गीताने कार्यक्रमाची बहारदार सुरवात झाली.

भीम टायगर सेनेच्यावतीने आयोजीत कार्यक्रमाचे कौतुक करून जयंत्या साजऱ्या करण्यासोबतच प्रबळ आणि एकसंघ संघटन आणि त्या संघटनेच्या बळावर समाजासमोरील समस्या धसास लावणे अत्येंत गरजेचे आहे आणि त्यासाठी सर्व आंबेडकरी संघटनांनी आणीबाणीच्या प्रसंगी सर्वशक्तीनिशी एकत्रितपणे लढा देणे ही आजची सामाजीक गरज असल्याचे प्रतिपादन ऍड.वाय.एम्.जांभुळकर यांनी केले.

माता रमाईचा प्रपंच हा तिच्या कुटुंबापूरता मर्यादित नसुन तो तमाम दुःखीतांच्या दुःखाचा परीहार करण्याचा वसा होता!
आपल्या जीवचा जीव असलेल्या राजरत्नच्या मृतदेहास कफनाचे कापड म्हणून अंगावरील साडीचा पदर फाडून देणाऱ्या त्यागमूर्ती माऊलीचा आदर्श समाजातील आपल्या माता-भगिनींनी घ्यावा असे आवाहन दिपक भवरे यांनी आपल्या भाषणात केले.

माता तर भरपूर झाल्यात हल्ली मात्र त्यागमाता रमाई समान व्हावी;माता रमाईच्या अंगावरील ढिगळाचे ते लुगडे भारत देशाच्या तिरंगी ध्वजा समान अस्मितेचे प्रतीक होते असे भावोदगार भीमटायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे यांनी काढले.

एवढा असीम त्याग करून देखील माता रमाई जयंती औचित्याने तुरळक ठिकाणी सुद्धा अभिवादन बॅनर नसल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली!शेवट देखील कवि-गायक प्रा.जनार्धन गजभिये यांच्या माता रमाईच्या जीवन कर्तृत्वपर गायनाने झाला.या कार्यक्रमाला अण्णा दोङके,प्रभाकर खंदारे,संजय शेळके,दत्ता कांबळे ,गौतम खङसे,राहुल झुंजारे,सतिश खङसे,प्रीतम आळणे,मनोहर धवसे,गजानन कांबळे, उपस्थित होते.