उपळवटे येथे अक्षय देवडकर यांचा वाढदिवस साजरा – रश्मी (दिदी) बागल, संजय (बाबा) कोकाटे,यांची प्रमुख उपस्थिती

41

🔸अतुल (भाऊ) खुपसे-पाटील यांच्या आंदोलक वृत्तीचा आवर्जून उल्लेख

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.7फेब्रुवारी):-काल दि. ६ रोजी अक्षय भैय्या देवडकर यांच्या वाढदिवसाचा अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला.यावेळी माढा तालुक्याचे शिवसेनेचे नेते संजय बाबा कोकाटे, सौ. रश्मी दिदी बागल संचालिका (जि. म. बॅक संचालिका आदिनाथ सह. साखर कारखाना) आण्णासाहेब महाडिक (सरपंच शिंदवणे) सुहास पाटील (नेते रयत क्रांती संघटना) अतुल भाऊ खुपसे-पाटील यांनी आवर्जून उपस्थित होते. यावेळी मा.विजय खुपसे-पाटील, मा.संजय बाबा कोकाटे,मा. रश्मी दिदी बागल प्रकाश नाना खुपसे-पाटील ,आण्णासाहेब महाडिक यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

रश्मी दिदी मनोगत व्यक्त करताना बोलल्या की लोकशाही जिंवत ठेवायची असेल तर आंदोलने गरजेची आहेत. आणि *उपळवटे गावची ओळखच आंदोलकांचे गाव म्हणून आहे , कारण *अतुल खुपसे- पाटील यांनी वेळोवेळी अन्यायाविरुद्ध केलेली आंदोलने* प्रसंगी अतुल भाऊंनी माझ्या विरोधातही आंदोलन केले आहे.तसेच प्रत्येकाला कसल्याही प्रकारची मदत लागली तर शक्य ती मदत करण्याची ग्वाही दिली.

यावेळी आदित्य बंडगर (करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष) , अमित चोपडे महाराष्ट्र विकास विद्यार्थी परिषदेचे सोलापूर जिल्ह्या प्रमुख) , अशोक (भाऊ) गरड(सामाजिक कार्यकर्ते), विजय खुपसे-पाटील,राजाभाऊ जाधव, अनिल जाधव, आदि उपस्थित होते.