काटखेडा येथे त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर जयंती साजरी

38

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.8फेब्रुवारी):-दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पुसद च्या अंतर्गत ग्रामीण शाखा काटखेडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची १२३ वी जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प .सदस्य भोलानाथ कांबळे हे उपस्थित होते.

तर प्रमुख अतिथी म्हणून प्रचार व पर्यटन जिल्हा सचिव भगवान बरडे, तालुकाध्यक्ष माजी सैनिक भारत कांबळे, माजी सैनिक नितीन धुळे ,बाळासाहेब ढोले हे उपस्थित होते .

सर्वप्रथम या मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करून व त्रिशरण पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .

यावेळी भगवान बरडे म्हणाले की त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या त्यागामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपणा सर्वांसाठी एवढे महान कार्य करू शकले. तसेच यावेळी अध्यक्षीय भाषणात जि. प. सदस्य भोलानाथ कांबळे यांनी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.

या कार्यक्रमास दिपक गायकवाड, दिलीप खिलारे, विश्वदिप झोडगे ,संतोष झोडगे, रतन खिल्लारे, पिंटू झोडगे, भिकाजी झोडगे ,विजय धुळे, शिवाजी झोडगे, सचिन कोल्हे, दिलीप झोडगे ,देऊल भगत, नंदू झोडगे , पवन टेंबरे, रामेश्वर खिल्लारे तसेच इत्यादी कार्यकर्ते आणि उपासक-उपासिका उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप खिल्लारे यांनी केले .तर आभार दिपक गायकवाड मानले.या कार्यक्रमाची सांगता सरणतय गाथेने करण्यात आली