मेंडकी येथील युवकांना त्यांच्या आत्मरक्षणासाठी मोफत कराटे प्रशिक्षणाला सुरुवात

32

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.8फेब्रुवारी):- रोजी रविवारला मेंडकी गावातील सर्व युवक & युवतींसाठी त्यांच्या स्व:रक्षणासाठी आजपासून “ग्राम पंचायत- मेंडकी” येथील पटांगणावर मोफत “कराटे प्रशिक्षण” सुरु करण्यात आले..पहिल्याच दिवशी मेंडकी आणि आसपासच्या गावातील ७० ते ८० युवकांनी यात सहभाग नोंदविला होता..यात प्रशिक्षक म्हणून ब्रम्हपुरीचे आंतरराष्ट्रीय कराटे कोच मा.गणेश लांजेवार सर आणि त्यांची टीम यांनी मोलाचे मार्गदर्शन करून मुलांना आत्मरक्षणाचे प्रशिक्षण दिले.

या शिबिराचे आयोजन, सुप्रसिद्ध कीर्तनकार प.पु.सविता ताई खरवडे यांच्या मार्गदर्शनात असून, स्वामी विवेकानंद संस्कार वर्ग- शाखा मेंडकी आणि वीर शिवाजी युवा मित्र मंडळ- मेंडकी तसेच लाईफ फाऊंडेशन सामाजिक संस्था, ब्रम्हपुरी यांनी मिळून केले.सदर शिबिराच्या पहिल्या दिवशी उद्घाटन प्रसंगी नंदिनी पाकमोडे, पुनम कुथे, अंकुश कोसरे, उदयकुमार पगाडे, भूषण आंबोरकर, सचिन गुरनुले, खेमचंद वसाके, आणि इतर बहुसंख्येने मान्यवर उपस्तिथ होते.